Lokmat Sakhi >Beauty > सतत गळून केस पातळ झाले? १ चमचा बेसनाचा फॉर्म्यूला; भराभर वाढतील केस, गळणं थांबेल

सतत गळून केस पातळ झाले? १ चमचा बेसनाचा फॉर्म्यूला; भराभर वाढतील केस, गळणं थांबेल

How to grow hair with besan at home : बेसनाच्या वापरानं स्कल्प चांगला राहण्यास मदत होते. याशिवा एक्स्ट्रा तेलही निघून जातं. बेसनामुळे केसांच्या विकासात मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 03:48 PM2023-04-29T15:48:20+5:302023-04-29T16:08:20+5:30

How to grow hair with besan at home : बेसनाच्या वापरानं स्कल्प चांगला राहण्यास मदत होते. याशिवा एक्स्ट्रा तेलही निघून जातं. बेसनामुळे केसांच्या विकासात मदत होते.

How to grow hair with besan at home : Besan Hair Pack Is Your Go To Solution For Thick And Long Hair | सतत गळून केस पातळ झाले? १ चमचा बेसनाचा फॉर्म्यूला; भराभर वाढतील केस, गळणं थांबेल

सतत गळून केस पातळ झाले? १ चमचा बेसनाचा फॉर्म्यूला; भराभर वाढतील केस, गळणं थांबेल

रोज केसांकडे दुर्लक्ष केल्यानं ते कोरडे होतात. कोरडे  केस विंचरल्यानंतर अगदी सहज तुटतात.  केसांचा पोत सुधारण्यासाठी आहारावर लक्ष देणं महत्वाचं आहे. प्रोटीन्सयुक्त पदार्थ खाल्ल्यानं केसांची वाढ होण्यास मदत होते.  (Besan Hair Pack Is Your Go To Solution For Thick And Long Hair) बेसन त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी उत्तम मानले जाते. बेसनाच्या वापरानं स्कल्प चांगला राहण्यास मदत होते. याशिवा एक्स्ट्रा तेलही निघून जातं. बेसनामुळे केसांच्या विकासात मदत होते. बेसनाचा केसांवर  वापर केल्यास केस चांगले राहण्यास मदत होते. (How to grow hair with besan at home)

चण्याचं पीठ आणि ऑलिव्ह ऑईल

चण्याच्या पीठातऑलिव्ह ऑईल मिसळून केसांना लावा. आता त्यात अर्धा चमचा बदाम पावडर आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल तेल घाला. ही पेस्ट तुमच्या केसांवर आणि टाळूवर नीट लावा. (Besan Hair Masks For Healthy Hair) अर्ध्या तासानंतर तुम्ही ते सौम्य शैम्पूने धुवा. यामुळे केस मऊ, कोमल आणि सुंदर होतील. केस वाढण्यास देखील मदत होईल. हा मास्क तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता.

चण्याचं पीठ आणि नारळाचं तेल

चण्याच्या पीठासह नारळाचं तेल मिसळून लावल्यानंही केसांवर चांगला परीणाम दिसून यतो. नारळाचं तेल केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यास मदत होते. ४ ते ५ चमचे बेसन नारळाच्या तेलात मिसळून लावा. ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावा. यामुळे तुमच्या केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल.

अंगात रक्त कमी झालंय? ५ व्हेज पदार्थ रोज खा, हिमोग्लोबिन वाढेल; अशक्तपणा होईल कमी

चण्याचं पीठ आणि मध

जर तुमचे केसही कोरडे  तर बेसनामध्ये मध मिसळून लावा, यासाठी तीन ते चार चमचे बेसन घ्या, त्यात मध आणि खोबरेल तेल मिसळा, आता ते केसांना आणि टाळूला लावा, अर्ध्या तासानंतर. सौम्य शॅम्पूने केस धुवा. यामुळे तुमची टाळू निरोगी राहील.

चण्याचं पीठ आणि पाणी

तुम्ही केसांना चण्याचं पीठ आणि पाणी देखील लावू शकता. ही पेस्ट बनवणे खूप सोपे आहे. 4 ते 5 चमचे बेसनामध्ये पाणी मिसळा आणि ते मिक्स करा आणि केसांसह टाळूला लावा. 10 मिनिटांनी केस चांगले धुवा. ही पेस्ट लावल्याने कोंडा दूर होईल. कोरड्या केसांची समस्याही दूर होईल

Web Title: How to grow hair with besan at home : Besan Hair Pack Is Your Go To Solution For Thick And Long Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.