हेअर केअर उत्पादनांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. कांद्याचा रस केस णं थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरतो. (Hair Care Tips) ज्यामुळे केस पांढरेसुद्धा होत नाहीत, केसांची वाढ व्यवस्थित होत नाही. कांद्याच्या रसात एंटी ऑक्सिडेंट्स आणि सल्फरचे प्रमाण जास्त असते, केस वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.(How To Make Your Hair Grow Faster Using Onion)
केस लांब करण्यासाठी तुम्ही कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. एका अभ्यासात दिसून आलेल्या माहितीनुसार जर्नल ऑफ डर्मेटलॉजीच्या रिपोर्टनुसार कांद्याचा रस केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. (Ref) या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या डोक्यावर कांद्याच्या वापराने केस उगवल्याचे दिसून आले. (How To Grow Hairs Faster)
लांब केसांसाठी कांद्याचा रस फायदेशीर
कांद्याचा रस केसांना कोणत्या पद्धतीने लावायचा हे समजून घेण्याआधी कांद्याचा रस काढण्याची योग्य पद्धत समजून घ्यायला हवी. सगळ्यात आधी एक कांदा घ्या. ब्लेंडरमध्ये घालून व्यवस्थित वाटून घ्या. त्यानंतर वाटलेला कांदा पिळून घ्या. त्यानंतर एका वाटीत कांद्याचा रस घ्या. हा रस केसांवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लावू शकता.
कंबर-पाठ खूपच दुखते? कॅल्शियमचा खजिना आहेत ६ पदार्थ, रोज खा- हाडांची दुखणी कायमची गायब
पहिली पद्धत
केसांना कांद्याचा रस लावण्याची पहिली पद्धत आहे. कांद्याचा रस बोटाने केसांच्या मुळांना लावा. केसांना एंटी ऑक्सिडेंट्सबरोबरच अनेक गुण मिळतात. ज्यामुळे केस लांबच लांब होतात.
दुसरी पद्धत
नारळाच्या तेलात कांद्याचा रस लावल्याने हेअर ग्रोथ ऑईल तयार करू शकता. एका वाटीत नारळाचं तेल घ्या. त्यात कांद्याचा रस घालून तेल शिजवून घ्या. या तेलाने तुम्ही मालिश करू शकता. आठवड्यातून २ ते ३ वेळा हे तेल केसांना लावा. नारळाच्या तेलात कांद्याचा रस घालून शिजवून घ्या. या तेलाने केसांची मालिश करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना लावा. नारळाच्या तेलात कांद्याचा रस घालण्याऐवजी तुम्ही कापूनही घालू शकता.
चौथी पद्धत
पिवळ्या मेथीच्या दाण्यांमध्ये कांद्याचा रस मिसळून हेअर मास्क लावू शकता. हा हेअर मास्क बनवण्यासाठी एक चमचा मेथीच्या दाण्यांची पावडर घ्या त्यात १ कांद्याचा रस मिसळा. हा हेअर मास्क केसांवर लावून १० मिनिटं तसंच ठेवा. नंतर धुवून ठेवा. महिन्यातून २ वेळा हेअर मास्क लावल्याने चांगला परिणाम दिसून येईल.