आजकाल केसांच्या समस्या प्रत्येकालाच उद्भवतात. (Hair Care Tips) केसांचे गळणं थांबवण्याासठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. केसांची चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात काय खाता, किती प्रमाणात खाता, त्यातून पोषक घटक मिळतात का हे सुद्धा महत्वाचे असते. (Hair Growth Tips)
आहारातील पोषक घटकांची कमतरता दूर करण्यासाठी नाश्ता आणि जेवणात पोषक पदार्थांचा समावेश असावा. रोज १ पौष्टीक लाडू खाल्ल्यास तुमच्या शरीराची कार्यक्षमता सुधारेल, त्वचा चांगली राहील आणि शरीर निरोगी राहण्यासही मदत होईल.(Ladoo For Hair Growth) एक लाडू खाण्यासाठी फारचा वेळही लागणार नाही आणि त्यातून पोषणही मिळेल.
फ्लोराकर्ल.युके च्या रिपोर्टनुसार आळशीच्या बीयांमध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. ज्यामुळे केस लांब आणि मजबूत होतात. यात एंटी इफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. भोपळ्याच्या बीयांमध्ये भरपूर फॅटी ऑईल्स असतात ज्यामुळे केसांची चांगली वाढ होते. मेथीच्या बीयांच्या सेवनाने केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. केसांची चांगली वाढ होण्यासाठी रोज बीयांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
केसांसाठी वाढीसाठी लाडू करताना कोणतं साहित्य वापराल? (How to Growth Hairs)
१) बदाम- एक कप
२) भोपळ्याच्या बीया- १ कप
३) सुर्यफुलाच्या बीया- १ कप
४) आळशीच्या बीया- १ कप
५) चिया सिड्स- १ कप
६) खजूर- ८ ते १०
लाडू करण्याची कृती
१) लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात बदामाचे काप, भोपळ्याच्या बीया, सुर्यफुलाच्या बीया, आळशीच्या बीया, चिया सिड्स हलके भाजून घ्या.
२) भाजताना गॅसची आच मंद ठेवा. हे मिश्रण जळणार नाही याची काळजी घ्या. त्याच खजूराचे तुकडे घालून हे मिश्रण एका वाडग्यात काढून घ्या.
शरीराला पोकळ बनवते व्हिटामीन्सची कमी; घरातले १० पदार्थ खा, 8 पट जास्त व्हिटामीन मिळेल
३) सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्या हे साहित्य एका प्लेटमध्ये काढून या मिश्रणाचे बारीक लाडू वळून घ्या. तयार आहे पौष्टीक लाडू.
मुलांना जरा धाकही नसतो-खूप हट्टीपणा करतात? मुलांना 'या' ६ गोष्टी शिकवा, शांत-गुणी होतील
४) हे लाडू खाल्ल्याने तब्येत चांगल राहण्यास मदत होईल. याशिवाय गंभीर आजारांपासूनही बचाव होण्यास मदत होईल.