Join us  

विंचरताना गळतात-केस पातळ झाले? तेलात १ पदार्थ मिसळून हेअर टॉनिक लावा; लांब होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 3:47 PM

How to Grow Hairs Naturally : पोषण मिळण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करायाल हवा.  हेअर टॉनिक बनवण्यासाठी तुम्हाला फार खर्च येणार नाही. (How To Grow Hairs) 

आपले केस लांब-दाट असावेत अशी प्रत्येकाची इच्चा असते. (Hair Care Tips) प्रदूषण, खराब लाईफस्टाईल, केमिकल्समुळ केसांच्या समस्या उद्भवतात. लांब, काळे केस मिळवण्यासाठी लोक महागडी उत्पादनं, टॉनिकचा वापर करतात. पोषण मिळण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करायाल हवा.  हेअर टॉनिक बनवण्यासाठी तुम्हाला फार खर्च येणार नाही. (How To Grow Hairs) 

न्यूट्रिशनिस्ट जुही कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर सांगितले की, हे टॉनिक केसांवर लावल्याने त्यांची वाढ वेगवान होऊ शकते. तर हे तयार करण्यासाठी तुम्हाला 4 चमचे रोझमेरीच्या पानांची आवश्यकता असेल. यानंतर, 2 कप पाणी आणि 4 थेंब रोझमेरी तेल लागेल.

हेअर ग्रोथ स्प्रे कसा तयार करायचा?

हा स्प्रे बनवण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात दोन कप पाणी घाला. हे पाणी गरम करा.पाणी गरम झाल्यावर त्यात ४ चमचे रोझमेरीची पाने टाका. ही पाने सुमारे 15 मिनिटे मंद आचेवर उकळा. पाणी अर्धे उकळल्यावर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. पाणी थंड झाल्यावर त्यात रोझमेरी तेलाचे 4 थेंब टाका. हे थंड केलेले द्रावण एका स्प्रे बाटलीत ठेवा. हे स्प्रे दररोज केसांवर फवारावे.

हे द्रावण या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते. स्प्रे वापरताना, हे लक्षात ठेवा की ते केसांच्या मुळांपर्यंत पोहोचायला हवं. हे कोरड्या आणि ओल्या केसांवर सहजपणे लावले जाऊ शकते. रोझमेरीचे पाणी लावल्यानंतर केस धुण्याची गरज नाही.

दातांवर पिवळा-चिकट थर दिसतो? अमेरीकन डेंटिस्ट सांगतात ५ गोष्टी करा-पांढरेशुभ्र होतील दात

या स्प्रेबाबत न्यूट्रिशनिस्ट जुही कपूरचा दावा आहे की तुमचे केस लवकर पांढरे होणार नाहीत आणि त्यांची वाढही वाढेल.जास्त खर्च न करता हे सहज घरी बनवता येते. पण हेही लक्षात ठेवा की केसांचे आरोग्य केवळ केसांचे तेल, शाम्पू किंवा स्प्रेशी संबंधित नाही. चांगल्या केसांसाठी योग्य आणि पौष्टिक आहारही खूप महत्त्वाचा आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी