Join us  

सतत गळून केस शेपटीसारखे पातळ झाले? राईच्या तेलात हा पदार्थ घालून लावा; घनदाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 12:29 PM

How to Grow Hairs Quickly (Kes Vadhvnyasathi Konte tel Lavayche) : घरगुती तेलाचा वापर केल्यास केसांची चांगली वाढ होण्यास मदत होईल

केस लांब , घनदाट असावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं. (kes vadhavnyache gharguti upay) केस मोठे करण्यासाठी महिला वेगवेगळ्या हेअर प्रोडक्ट्सचा वापर करतात.  (Homemade Hair Oil For Hair Growth) हेअर ऑईलपासून ते शॅम्पूपर्यंत प्रत्येक उत्पादनांचा वापर महिला करतात. नियमित केसांना तेल लावल्यामुळे केस फक्त लांब आणि दाट होत नाही तर केस पांढरे होण्याचा त्रासही टळतो. घरगुती तेलाचा वापर केल्यास केसांची चांगली वाढ होण्यास मदत होईल आणि केस दीर्घकाळ लांब आणि दाट  राहण्यास मदत होईल. (How to Grow Hairs Quickly)

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार राईच्या तेलात नॅच्युरल फॅट्स असतात ज्यामुळे केसांना डिप कंडिशनिंग मिळते. १०० ग्राम राईच्या तेलात ५९ ग्राम मोनोसॅच्युरेडेट फॅट, २१ ग्रॅम पॉलिसच्युरेडेट फॅट्,  १२ ग्रॅम सॅच्युरेडेट फॅट्स असतात. यात एंटी फंगल आणि एंटी बॅक्टेरिअल प्रॉपर्टिज असतात. ज्यामुळे स्कल्प कोरडा होणं, फ्रिजीनेलस, केसांना फाटे फुटणं असे त्रास  टाळता येतात.(Mustard Oil Good Foe Hairs Growth)

हे हेअर ऑईल तयार करण्यासाठी तुम्हाला राईचे तेल आणि कांद्याचे साल लागेल.  (Mustard Oil With Onion Peel Hair Oil Recipe For Long Hairs) कांद्याच्या सालीतील गुण केसांना काळे होण्यास मदत करतात. याशिवाय केस लांब आणि दाटही होतात. हेअर ऑईल कसं तयार करायचं ते पाहूया.

लांबसडक दाट केसांसाठी घरगुती तेल कसे करावे (How to Make Hair Oil For Fast Hair Growth)

१) कांद्याचे साल- १ वाटी

२) मोहोरीचे तेल - १ वाटी

३) कढीपत्ता- १० ते १५

हे हेअर ऑईल तयार करण्यासाठी सगळ्यात आधी १ लोखंडाची कढई घ्या. त्यात मोहोरीचे तेल घालून गरम  करा. नंतर या तेलात कांद्याचे साल आणि कढीपत्ता घालून पुन्हा गरम करा. जोपर्यंत तेलाचा रंग बदलत  नाही तोपर्यंत शिजवत राहा. नंतर गॅस मंच आचेवर ठेवून बंद करा आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. त्यानंतर हे तेल एका बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवा. अंघोळीच्या आधी केसांना हे तेल लावा. त्यांतर अर्धा ते एक तास थांबून मग केस धुवा.

हे तेल केसांना लावण्याची योग्य पद्धत कोणती? (kes vadhvnyasathi konte tel vaprave)

1) हे खास हेअर ऑईल केसांना लावण्यासाठी सगळ्यात आधी केसांच्या लांबीनुसार तेल घ्या.  या तेलाने केसांच्या मुळांची मसाज करा.  जवळपास ३० मिनिटं ते २ तास असंच सोडा. त्यानंतर केस शॅम्पूच्या मदतीने स्वच्छ धुवा.

केस पातळ दिसतात-अजिबात वाढत नाही? नारळाचे दूध 'या' पद्धतीने लावा, दाट होतील केस

2) आठवड्यातून २ वेळा हे हेअर ऑईल केसांना लावल्याने तुमचे केस दाट होतील.  जर तुम्हाला कंबरेपर्यंत लांब केस वाढवायचे असतील तर तुम्ही नियमित हे तेल केसांना लावू शकता. यासाठी तुम्हाला खाणं पिणं आणि आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्वाचे आहे. केसांना फाटे फुटले किंवा केस  पातळ झाले असतील तर खालून ट्रिम करा.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य