Join us  

गळून पातळ झालेल्या केसांमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? अर्धा चमचा मेथी ‘अशी’ लावा; भराभर वाढतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 6:10 PM

How To Grow Hairs Using Methi : मेथीच्या दाण्यांमध्ये व्हिटामीन ए, के, सी याबरोबरच फॉलिक एसिड, कॅल्शियम,पोटॅशियम असते.  

मेथीचे दाणे  केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी गुणकारी ठरते. केसांच्या चांगल्या वाढीसाठी मेथीच्या दाण्यांचा केसांवर कोणत्या प्रकारे वापर करता येईल ते समजून घेऊ. मेथीच्या दाण्यांतून भरपूर प्रोटीन आणि आयर्न मिळते. (Hair Care Tips) ज्यामुळे केस हेल्दी राहतात. याशिवाय मेथीच्या दाण्यांमध्ये व्हिटामीन ए, के, सी याबरोबरच फॉलिक एसिड, कॅल्शियम,पोटॅशियम असते.  ज्यामुळे केस दाट राहण्यास मदत होते. याशिवाय स्काल्पचे आरोग्यही सुधारते. केस मजबूत दाट होतात. (How To Grow Hairs Using Methi)

 नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार मेथीचा केसांवर वापर केल्यानं केसांची वाढ होत असल्याचे दिसून आले.  या अभ्यासात गेलेल्या नवीन फॉम्यूलेशन संबंधित चांगली परिणामकारकता दर्शवली. केसांवर करण्यात आलेल्या प्रयोगात केसांची चांगली वाढ  झाल्याचे दिसून आले. 

केसांवर मेथी दाणे लावण्याची योग्य  पद्धत (How To Use Methi on Hairs)

केसांना लांब करण्यासाठी तुम्ही मेथीच्या दाण्यांमध्ये नारळाचं तेल मिसळून केसांना लावू शकता.  एक वाटी नारळाचे तेल घ्या. एका भांड्यात घाला. त्यात ३ ते ४ चमचे मेथीचे दाणे घाला. आता हे तेल गॅसवर ठेवून व्यवस्थित गरम करा. आता तेल थंड करून केसांच्या मुळांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. जवळपास १ तास तसंच ठेवल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून  २ वेळा  केल्यास केसांची  चांगली वाढ होईल.

मेथीचे दाणे आणि कढीपत्ता

मेथीच्या दाण्यांबरोबर कढीपत्ताच्या वापर केल्यास केस हेल्दी  दाट होण्यास मदत होते. सगळ्यात आधी एका ब्लेंडरमध्ये मेथीचे दाणे आणि कढीपत्ता घेऊन व्यवस्थित  ब्लेंड करून घ्या. त्यानतंर एका पॅनमध्ये काढून  पाणी घालून व्यवस्थित उकळून घ्या. ५ मिनिटं उकळल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर मिश्रण गाळून घ्या.

फ्रिजच्या पाण्यासारखं थंड होईल माठातलं पाणी; माठात 'हा' पदार्थ घाला- पाहा व्हायरल व्हिडिओ

हे पाणी कोणत्याही बॉटलमध्ये भरून रात्रभर तसंच सोडून द्या.  दुसऱ्या दिवशी पाणी हलकं गरम करून केसांच्या मुळांना लावा. सुकल्यानंतर अर्धा तास तसंच सोडून द्या. त्यानंतर  स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्या. हा उपाय केल्यानंतर केसांना शॅम्पू किंवा कंडिशनर लावू नका.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी