Join us  

केस गळून विरळ झाले? रामदेव बाबा सांगतात 1 सोपा उपाय, केस होतील लांब घनदाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 1:39 PM

How To Grow Long and Thicken Hair Naturally केसांवर टॉनिक म्हणून काम करते त्रिफळाचे पावडर, पाहा वापर व फायदे

सुंदर, लांबसडक, घनदाट केस कोणाला आवडत नाही. परंतु, बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांची निगा राखणं कठीण होऊन जाते. केस गळणे, केस अकाली पांढरे होणे, केसात कोंडा, या समस्यांमुळे प्रत्येक व्यक्ती हैराण आहे. केसांची समस्या सोडवण्यासाठी लोकं कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचा वापर करतात. परंतु, कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समध्ये केमिकल रसायनांचा वापर केला जातो. ज्यामुळे केस अधिक खराब - निर्जीव होतात. केसांची बाहेरून निगा राखण्यासोबत डाएटमध्ये देखील काही बदल करणे गरजेचं आहे. काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस कमजोर होतात. यावर उपाय म्हणून आपण आयुर्वेदिक औषधी वनस्पती त्रिफळाचा वापर करून पाहू शकता(How To Grow Long and Thicken Hair Naturally).

आयुर्वेदिक एक्स्पर्ट योगगुरु रामदेव बाबा यांच्या मते, ''त्रिफळाचा वापर करून आपण केसांना घनदाट व मजबूत करू शकता. त्रिफळा ही एक अशी औषधी वनस्पती आहे, जे केसांचे हेअऱ फॉलिकल्स स्टिमुलेट करते, ज्यामुळे केसांची योग्य वाढ होते.''

त्यांच्या मते, केसांवर त्रिफळाचा वापर केल्याने केस मुळापासून घट्ट, व मजबूत होतात. त्रिफळा हे तीन औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे. यात अमलाकी, विभिताकी आणि हरितकी यांचा समावेश आहे. त्रिफळा वनस्पती जितकी आरोग्यासाठी चांगली आहे, तितकीच केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे केसांच्या समस्या सुटतात. 

पावसाळ्यात पायांना खाज सुटते? घाण पाण्याचे इन्फेक्शन होते? 4 उपाय, संसर्ग टाळा...

केसांवर त्रिफळाचा वापर कसा करावा?

सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा, पाणी गरम झाल्यानंतर त्यात २ चमचे त्रिफळा पावडर घालून पाणी उकळून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा मेथी दाणे घाला. व ५ मिनिटे मेथी दाणे शिजवून घ्या. आता चहाच्या गाळणीने पाणी गाळून घ्या.

फक्त २० रुपयांत ३ स्टेप्स वापरुन घरच्याघरी करा पेडिक्युअर, पाय दिसतील सुंदर-स्वच्छ

पाणी कोमट झाल्यानंतर स्काल्पवर लावून मसाज करा. याशिवाय या पाण्याचा वापर आपण केस धुण्यासाठी देखील करू शकता. पौष्टीक तत्वांनी समृद्ध त्रिफळाच्या पाण्याचा वापर केल्यामुळे केस गळती, केसात कोंडा, केस पांढरे होणे, स्काल्पवर खाज, या समस्येपासून सुटका मिळू शकेल. त्रिफळाचा वापर आपण आठवड्यातून २ वेळा करू शकता. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स