Join us  

सुंदर आकर्षक लांबसडक पापण्या हव्या? पापण्यांना लावा रोज ‘खास’ तेल, डोळे दिसतील टपोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2024 4:21 PM

How To Grow Longer Lashes : पापण्यांचे केस गळतात, पापण्याच विरळ झाल्या तर त्यावर उपाय, ३ प्रकारचे तेल, पापण्या होतील सुंदर

'लवलव करी पातं, डोळं नाही थाऱ्याला, एकटक पाहू कसं, लुकलुक ताऱ्याला..' डोळे आणि पापण्यांवर भाष्य करणारं हे सुंदर गाणं आपण ऐकलंच असेल. डोळ्यांवर आजतागायत अनेक गाणी तयार झाले आहेत. जे डोळ्यांच्या सौंदर्याला दर्शवते. डोळ्यांची शोभा मुख्य म्हणजे पापण्यांमुळे वाढते. सुंदर, काळेभोर, मोठ्या पापण्या कोणाला नाही आवडत. पण काहींच्या पापण्या लहान तर, काहींच्या पापण्या मोठ्या असतात. पापण्या मोठे आणि आकारात दिसावे यासाठी बरेच जण मस्काराचा वापर करतात. पण डोळ्यांवर आपण नियमित मस्कारा लावू शकत नाही.

काही मस्कारामध्ये केमिकल रसायनांचा वापर होतो. ज्यामुळे पापण्या खराब होऊ शकतात, किंवा त्याचे केस तुटू शकतात. जर आपल्याला मस्काराशिवाय मोठ्या पापण्या हव्या असतील तर, ब्यूटी उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक उपायांना ट्राय करून पाहा. या घरगुती उपायांमुळे डोळे सुंदर, आकर्षक तर दिसतीलच शिवाय, मोठ्या पापण्यांमुळे डोळ्यांची आणखीन शोभा वाढेल(How To Grow Longer Lashes).

पापण्या वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय

खोबरेल तेल

पापण्या वाढवण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करू शकता. नारळाच्या तेलामध्ये फॅटी ऍसिड असते. जे केसांच्या मुळापर्यंत जाऊन वाढीसाठी मदत करतात. शिवाय आतून मुळांना पोषण देतात. ज्यामुळे पापण्यातील केस दाट होतात.

कोंड्याने जीव नको केला, केस बारीक कापणार? कोरफडीच्या गराचा करा १ उपाय, कोंडामुक्त केस

व्हिटॅमिन ई तेल

पापण्या वाढवण्यासाठी आपण व्हिटॅमिन ई तेलाचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत बदामाचे तेल घ्या. त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा. रोज रात्री झोपण्यापूर्वी पापण्यांवर तयार तेल लावा. असे केल्याने पापण्यांची वाढ होईल. शिवाय पापण्या जाड दिसतील. आपण याचा वापर आठवड्यातून ३ वेळा करू शकता.

नेहमीच्या खोबरेल तेलात घाला फक्त २ गोष्टी, केस गळणं कायमचं थांबेल; कोंडाही गायब

एरंडेल तेल

बहुतांश लोकं केस दाट करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करतात. त्यातील रेटिनॉल घटक केस दाट आणि जाड करण्यास मदत करतात. पापण्यांवर एरंडेल तेल लावण्यापूर्वी त्यात खोबरेल तेल मिक्स करा. तयार तेल पापण्यांवर लावा. आपण याचा वापर आठवड्यातून ३ वेळा करू शकता. हे तेल रात्री पापण्यांवर लावून झोपा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी