केस लांब असो किंवा शॉर्ट आजकाल प्रत्येकाचेच केस गळतात किंवा केस पांढरे होण्याचा प्रोब्लेम होतो. जर काहीजणांचे केस गळून गळून टाळू दिसायला सुरूवात होते. (How to Grow New Hairs Faster)लोक वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर ट्रिटमेंट्स घेतात, हेअर केअर उत्पादनांचा वापर करतात पण त्याचा पुरेपूर फायदा दिसून येत नाही. (Kesanna dahi kase lavayche) यातील केमिकल्स केसांच्या आरोग्याला नुकसान पोहोचवतात. अशात केसांच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता. (How to Apply Curd on Hair)
दही केसांसाठी अनेकप्रकारे गुणकारी ठरते. यातील एंटी बॅक्टेरिअल गुण स्काल्पमधील बॅक्टेरिअल इन्फेक्शन, डेड स्किन आणि कोंडा काढून टाकण्यास मदत करतात. दह्यातील तत्व हेअर फॉलिकल्सना मजबूत करतात आणि केस गळण्याची समस्या टाळण्यास मदत करतात. याशिवाय केस सॉफ्ट, शायनी राहतात. (Curd for Hair Growth)
मेथीचे दाणे आणि दही
मेथीचे दाणे दह्यात मिसळून लावल्यास केसांना अनेकदृष्ट्या फायदे मिळतात. यामुळे केस गळती थांबते आणि कोंड्याची समस्या दूर होते. दही आणि मेथीचा मास्क केसांना लांब आणि दाट बनवण्यास मदत करतो. हा मास्क बनवण्यासाठी २ ते ३ चमचे दही घ्या त्यात २ चमचे मेथी पावडर घालून व्यवस्थित एकजीव करा. ही पेस्ट केस आणि स्काल्पर लावून हलक्या हातानं मसाज करा. १ तासासाठी तसंच लावून ठेवा नंतर माईल्ड शॅम्पूने केस धुवा.
पोट सुटत चाललंय, व्यायामासाठी वेळच नसतो? रोज इतका वेळ चाला-आपोआप कमी होईल फॅट
दही आणि ऑलिव्ह ऑईल
केस गळण्याची समस्या टाळण्याासाठी तुम्ही दही किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत दही आणि ऑलिव्ह ऑईल मिसळवून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्काल्पला लावून ५ मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा. अर्ध्या तासाने माईल्ड शॅम्पूने केस धुवा. चांगल्या परिणामांसाठी दिवसभरातून २ वेळा ही पेस्ट केसांना लावा. या पेस्टच्या वापराने केस गळणं कमी होतं. याशिवाय कोंड्यापासूनही आराम मिळतो. केस गळणं कमी होतं.
दूध न पिता कॅल्शियम कसं मिळेल? दुप्पट कॅल्शियम असलेले ८ पदार्थ खा-२०६ हाडं होतील मजबूत
कांदा आणि दही
केसांचे गळणं कमी करण्यासाठी कांदा आणि दह्याचे मिश्रण उत्तम पर्याय आहे. कांद्यात सल्फर असते. ज्यामुळे केसांचे गळणं कमी होतं आणि केसांच्या वाढीस मदत होते. या मिश्रणाचा मास्क बनवण्यासााठी एका बाऊलमध्ये २ चमचे दही घ्या ३ ते ४ चमचे कांद्याचा रस मिसळा. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळून केसांना लावून अर्ध्या तासासाठी तसेच ठेवून द्या. त्यानंतर माईल्ड शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क लावल्यास चागंला परिणाम दिसून येईल.