Join us  

भुवया फार विरळ झाल्या, बारीक दिसतात? दाट आयब्रोसाठी 3 नैसर्गिक- सुरक्षित उपाय, डोळे दिसतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 4:12 PM

How to Grow Thicker Eyebrows Naturally : रासायनिक उत्पादने वापरण्यापेक्षा घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी भुवयांचे केस दाट करता आले तर..

ठळक मुद्देकेमिकल उत्पादने वापरण्यापेक्षा घरगुती उपाय केव्हाही सोयीचे...आयब्रो दाट आणि जाड असतील तर चेहरा नकळत चांगला दिसतो, पाहूयात सोपे उपाय

डोळे, भुवया, पापण्या या गोष्टी आपल्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. मात्र अनेकदा हे सगळे बहुतांशवेळा आपल्याला अनुवंशिकरित्या मिळालेले असते. मग भुवया कोरण्यासाठी किंवा डोळे जास्त आकर्षक दिसण्यासाठी आपण पार्लरची किंवा सौंदर्यप्रसाधनांची मदत घेतो. आयब्रो पेन्सिल, कृत्रिम आयलॅशेस, आय शॅडो, आय लायनर, काजळ, आयब्रो पेन्सिल यांसारख्या गोष्टींचा वापर प्रामुख्याने केला जातो (Beauty Tips For Eyebrows). पण मात्र नैसर्गिकरित्याच भुवया आणि पापण्यांचे केस दाट आणि चांगले असतील तर असे काही करावे लागत नाही. तसेच यासाठी बाजारात मिळणारी रासायनिक उत्पादने वापरण्यापेक्षा घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी भुवयांचे केस दाट करता आले तर, पाहूयात यासाठी काही सोपे उपाय (How to Grow Thicker Eyebrows Naturally)... 

(Image : Google)

१. कोरफडीचा वापर फायदेशीर

भुवयांचे केस जास्त प्रमाणात गळत असतील तर कोरफडीचा वापर अतिशय उपयुक्त ठरतो. कोरफडीच्या गरात Aloenin नावाचा एक घटक असतो. केसांच्या वाढीसाठी या घटकाचा अतिशय चांगला उपयोग होतो. याबरोबरच कोरफडीच्या गरात व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते ज्यामुळे केसांच्या वाढीसोबतच त्यांची शाईन वाढवण्यासाठीही कोरफडीचा चांगला उपयोग होतो. कोरफडीच्या गराबरोबरच एरंडेल तेल, व्हिटॅमिन ई कॅप्सुल यांचा वापर हे केस गळू नयेत यासाठी करता येतो. रोज रात्री झोपताना भुवयांना तेल लावल्यासही कोरडेपणा कमी होण्यास आणि भुवया दाट होण्यास मदत होते. 

२. घरच्या घरी करा नैसर्गिक पॅक

१ चमचा आल्याचा रस, १ चमचा लसणाचा रस, १ चमचा कोरफडीचा गर आणि १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे सगळे एकत्र करुन आयब्रोला लावून ठेवा. १५ मिनीटांनी साध्या पाण्याने     आयब्रो स्वच्छ धुवून टाका. 

फायदे 

१. लसणात असणारे अँटी बॅक्टेरीयल आणि अँटी फंगल गुणधर्म याठिकाणी काही संसर्ग असेल तर तो कमी करण्यास उपयुक्त ठरतात. २. आल्यामुळे आयब्रोच्या ठिकाणी असलेला कोरडेपणा, कोंडा यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. यामध्ये असणारे झिंक केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करते. त्यामुळे आलं आयब्रोजसाठी फायदेशीर ठरते. ३. कोरफडीमुळे याठिकाणचे केस फक्त वाढत नाहीत तर ते मुलायम आणि चमकदार बनण्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. मात्र हा उपाय करण्याआधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. 

(Image : Google)

३. हा उपाय करुन पाहा 

एरंडेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेल, पेट्रोलियम जेली आणि आयब्रो ग्रोथ सिरम अशा सगळया गोष्टी एकत्र करा आणि रात्रीच्या वेळी झोपताना चेहरा स्वच्छ करुन हे मिश्रण आयब्रोवर लावा. रात्रभर हे मिश्रण आयब्रोवर लावून ठेवा. सकाळी उठल्यावर चेहरा आणि आयब्रो स्वच्छ धुवा. यामुळे आयब्रोचे केस पातळ झाले असतील तर ते दाट होण्यास किंवा गळत असतील तर गळणे कमी होण्यास मदत होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सडोळ्यांची निगामेकअप टिप्सहोम रेमेडी