Lokmat Sakhi >Beauty > How To Grow Hair Faster : एका आठवड्यात लांबसडक, दाट केस देईल जावेद हबीबचा खास उपाय; केस गळणंही थांबेल

How To Grow Hair Faster : एका आठवड्यात लांबसडक, दाट केस देईल जावेद हबीबचा खास उपाय; केस गळणंही थांबेल

How To Grow Hair Faster : जावेद हबीब यांनी सांगितले की, तुम्ही कोणत्याही रसायनाशिवाय तुमच्या केसांच्या वाढीचा वेग वाढवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेले दोन कच्चे पदार्थ लागतील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 09:06 AM2022-08-21T09:06:00+5:302022-08-21T09:10:01+5:30

How To Grow Hair Faster : जावेद हबीब यांनी सांगितले की, तुम्ही कोणत्याही रसायनाशिवाय तुमच्या केसांच्या वाढीचा वेग वाढवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेले दोन कच्चे पदार्थ लागतील

How To GrowHair Faster : Jawed habib hair care tips to promote hair growth with onion and ginger | How To Grow Hair Faster : एका आठवड्यात लांबसडक, दाट केस देईल जावेद हबीबचा खास उपाय; केस गळणंही थांबेल

How To Grow Hair Faster : एका आठवड्यात लांबसडक, दाट केस देईल जावेद हबीबचा खास उपाय; केस गळणंही थांबेल

जावेद हबीब अनेकदा त्याच्या चाहत्यांना आणि ग्राहकांना हेअर केअरच्या टिप्स देतो. आजकाल केस गळण्याची समस्या सर्वच वयोगटातील लोकांमध्ये उद्भवते. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी दिलेले उपाय केल्यास एका आठवड्यात तुमचे केस वाढण्यास मदत होईल. हे उपचार करणे खूप सोपे आहे कारण त्यासाठी तुमचा फक्त 15 मिनिटांचा वेळ लागेल. (Jawed habib hair care tips to promote hair growth with onion and ginger)

केस गळणं थांबवण्याचं जावेद हबीबचं सिक्रेट

जावेद हबीब यांनी सांगितले की, तुम्ही कोणत्याही रसायनाशिवाय तुमच्या केसांच्या वाढीचा वेग वाढवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेले दोन कच्चे पदार्थ लागतील आणि या दोघांचा अर्क कोणत्या प्रमाणात मिसळून केसांमध्ये लावावा लागेल.

आलं आणि कांद्याचं सिक्रेट

त्यांनी आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की, कांदा आणि आले बारीक करून त्यांचा रस बनवा. नंतर ही दोन्ही द्रावणं मिसळा. या मिश्रणात 50 टक्के कांद्याचा रस आणि 50 टक्के आल्याचा रस असावा. लक्षात ठेवा की हा कांदा आणि आल्याचा रस पूर्णपणे ताजा असावा. हे पूर्णपणे हर्बल आणि ताजे केस वाढवणारे द्रव असल्याने त्याचा परिणाम केसांवर लवकर दिसून येईल.

वाढत्या वयातही तरूण ग्लोईंग दिसेल त्वचा; शहनाज हुसैन यांनी सांगितल्या ब्यूटी टिप्स

कांदा आणि आले यांचे द्रव मिश्रण केसांच्या मुळांना लावायचे आहे. कारण केसांच्या वाढीसाठी, मुळांना योग्य पोषण आवश्यक आहे आणि टाळूला संसर्ग बरा उपचार आवश्यक आहे. मग केस लांब वाढतात. तुम्हाला फक्त हे मिश्रण तुमच्या केसांमध्ये फक्त 10 मिनिटे ठेवावे लागेल. यानंतर तुम्हाला शॅम्पू करावे लागेल.

जावेद खात्री देतात की आठवड्यातून एकदा 10 मिनिटे आणि आठवड्यातून एकदाच ही प्रक्रिया केल्यास केसांच्या वाढीवर त्याचा परिणाम दिसून येईल. तुमचे केस नक्कीच लांब होतील, ही पद्धत काही आठवडे सतत वापरून पहा.

Web Title: How To GrowHair Faster : Jawed habib hair care tips to promote hair growth with onion and ginger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.