हिवाळा सुरु झाला की, बहुतेक सगळ्यांचीच त्वचा कोरडी पडू लागते. त्वचा कोरडी पडणे, त्वचेला भेगा पडणे, त्वचा फुटून पांढरीशुभ्र होणे अशा त्वचेसंबंधित अनेक समस्यांचा सामाना आपल्याला करावा लागतो. या दिवसांत वातावरणातील गारठ्यामुळे प्रामुख्याने हात,पाय, ओठांची त्वचा कोरडी पडते. हात, पाय आणि ओठांसोबतच (Effective Home Remedy to Heal Cracked Heels) सगळ्यांत जास्त त्रास देणारी समस्या म्हणजेच पायांच्या टाचा फुटणे. हिवाळ्यात अनेकदा भेगा पडलेल्या टाचांचा खूप त्रास होतो. पायांच्या टाचांना (How to care for dry, cracked heels) भेगा पडल्यामुळे केवळ पायांचे सौंदर्यच (Remove Cracked Heels By Using Curd) खराब होत नाही तर वेदना देखील तितक्याच जास्त होतात. वेळीच या फुटलेल्या टाचांकडे लक्ष दिले नाही तर ही समस्या अधिक वाढत जाऊन या टाचांना पडलेल्या भेगांमधून रक्त देखील येऊ शकते.
टाचांना अशा प्रकारे भेगा पडल्याने आपल्याला उभे राहण्यास किंवा चालताना खूप त्रास होतो. आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या टाचा फक्त हिवाळ्यातच नाही तर वर्षाचे बाराही महिने महिने फुटलेल्याच असतात. अशा फुटलेल्या टाचांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्रिम, लोशन, तेल लावतोच. यामुळे काही काळासाठी थोडा आराम मिळतो परंतु ही समस्या काही केल्या समूळ नष्ट होत नाही. यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करून पाहू शकतो. फुटलेल्या टाचांवर असरदार उपाय म्हणून आपण दह्याचा वापर करू शकतो. फुटलेल्या टाचा किंवा हिवाळ्यात कोरडी पडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी करण्यासाठी दह्याचा वापर नेमका कसा करावा ते पाहूयात.
टाचांच्या भेगा - कोरड्या त्वचेसाठी दह्याचा वापर करण्याच्या दोन पद्धती...
आपण हे दोन्ही उपाय फुटलेल्या टाचा किंवा कोरड्या त्वचेवरही करु शकता. परंतु फुटलेल्या टाचांवर हे उपाय करण्याआधी, आपले पाय स्वच्छ धुवून घ्यावेत.त्यानंतर एका बादलीत गरम पाणी घ्यावे या गरम पाण्यात प्रत्येकी १ टेबलस्पून शाम्पू आणि जाडे मीठ घालावे. अशा पाण्यात पाय ठेवून १० ते १५ मिनिटे तसेच बसून राहावे. यामुळे आपल्या पायांची त्वचा आणि टाचा स्वच्छ होतील. यातील घाण बाहेर निघून त्वचा स्वच्छ धुतली जाईल. त्यानंतरच खालील दोन्ही उपाय करावेत. यामुळे आपल्या टाचांची त्वचा अधिक मऊमुलायम होईल आणि टाचांवर दह्याचा उपाय देखील अगदी असरदार पद्धतीने करता येईल.
पार्लरमध्ये केली जाणारी महागडी केरेटीन ट्रिटमेंट करा घरीच, होईल पैशांची बचत - केस होतील चमकदार...
१. सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये २ टेबलस्पून दही, प्रत्येकी १ टेबलस्पून बेकिंग सोडा आणि मध घ्यावे. त्यानंतर हे बाऊलमधील तिन्ही जिन्नस व्यवस्थित कालवून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. आता ही तयार पेस्ट आपल्या कोरड्या त्वचेवर किंवा भेगा पडलेल्या टाचांवर लावून घ्यावी. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करावा. ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करून ही पेस्ट त्वचेत हळूहळू शोषली जाईल. त्यानंतर कोमट गरम पाण्याने त्वचा किंवा टाचा स्वच्छ धुवून घ्याव्यात. मग टॉवेलने पुसून त्वचा आणि टाचा कोरड्या करून घ्याव्यात. त्यानंतर त्वचेवर आणि टाचांवर कोणतेही मॉइश्चरायझिंग क्रिम किंवा खोबरेल तेल लावून हलकेच मसाज करून घ्यावा. दह्यामध्ये असलेले नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म केवळ त्वचा मऊच करत नाहीत तर त्वचा आतून स्वच्छ देखील करतात. दही हे थंड असते, त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. बेकिंग सोड्याचा एक्सफोलिएटिंग गुणधर्म मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतो, याचबरोबर मध आपल्या त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते यामुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार होते.
कॉमेडियन भारती सिंह सांगते, केस काळे करण्याचा सुपरहिट फॉर्म्युला, पांढऱ्या केसांची चिंताच सोडा....
२. एका मोठ्या बाऊलमध्ये २ टेबलस्पून दही, प्रत्येकी १ टेबलस्पून हळद पावडर, बेकिंग सोडा, एलोवेरा जेल घ्यावे. त्यानंतर हे बाऊलमधील चारही जिन्नस व्यवस्थित कालवून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. आता ही तयार पेस्ट आपल्या कोरड्या त्वचेवर किंवा भेगा पडलेल्या टाचांवर लावून घ्यावी. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करावा. ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर कोमट गरम पाण्याने त्वचा किंवा टाचा स्वच्छ धुवून घ्याव्यात. मग टॉवेलने पुसून त्वचा आणि टाचा कोरड्या करून घ्याव्यात. त्यानंतर त्वचेवर आणि टाचांवर कोणतेही मॉइश्चरायझिंग क्रिम किंवा खोबरेल तेल लावून हलकेच मसाज करून घ्यावा. हळदीचा वापर जखम बरी करण्यासाठी केला जातो, यासोबतच यात अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे पायांच्या भेगा लवकर भरुन येण्यास अधिक मदत मिळते. याचबरोबर,एलोवेरा जेल मधील मॉइश्चरायझिंग गुणधर्मामुळे त्वचा लगेच मऊ आणि कोमल होते. एलोवेरा जेल त्वचेला अतिरिक्त ओलावा आणि मॉइश्चरायझिंग करेल.