Lokmat Sakhi >Beauty > तळपायाला खूप भेगा पडल्या? हा घ्या आजीबाईंच्या बटव्यातला खास उपाय, इतर कोणत्याही क्रिमची गरजच नाही

तळपायाला खूप भेगा पडल्या? हा घ्या आजीबाईंच्या बटव्यातला खास उपाय, इतर कोणत्याही क्रिमची गरजच नाही

Winter Care Tips For Cracked Heel: थंडीमुळे पाय उलले असतील आणि तळपायाला भेगा पडल्या असतील तर हा एक उत्तम घरगुती उपाय करून पाहा.. आजीबाईंच्या बटव्यातली खास ट्रिक (homemade cream for cracked heel)... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2023 03:45 PM2023-11-29T15:45:11+5:302023-11-29T15:47:32+5:30

Winter Care Tips For Cracked Heel: थंडीमुळे पाय उलले असतील आणि तळपायाला भेगा पडल्या असतील तर हा एक उत्तम घरगुती उपाय करून पाहा.. आजीबाईंच्या बटव्यातली खास ट्रिक (homemade cream for cracked heel)... 

How to heel cracked heel? Home remedies for softening cracked heel, homemade cream for cracked heel | तळपायाला खूप भेगा पडल्या? हा घ्या आजीबाईंच्या बटव्यातला खास उपाय, इतर कोणत्याही क्रिमची गरजच नाही

तळपायाला खूप भेगा पडल्या? हा घ्या आजीबाईंच्या बटव्यातला खास उपाय, इतर कोणत्याही क्रिमची गरजच नाही

Highlightsआजीबाईंच्या बटव्यातला हा एक खास नुस्का तुमच्या पायांना बघा आठवडाभरातच कसं मऊ- मुलायम करून टाकेल

थंडी पडली की अनेक जणींच्या तळपायाला खूप मोठ्या मोठ्या भेगा पडतात. पायात चप्पल, सॉक्स वापरले तरी भेगा पडतातच. अनेक जणींच्या या भेगा एवढ्या वाढतात की त्यामधून रक्त येऊ लागते. अगदी टाच जमिनीवर ठेवलं तरी भेगा ठणकतात (How to heel cracked heel?). बऱ्याचदा महागडे क्रिम वापरूनही म्हणावा तसा फरक पडत नाही. तुमच्याही बाबतीत असंच काहीसं झालं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (Home remedies for softening cracked heel). आजीबाईंच्या बटव्यातला हा एक खास नुस्का तुमच्या पायांना बघा आठवडाभरातच कसं मऊ- मुलायम करून टाकेल (homemade cream for cracked heel)....

 

तळपायांच्या भेगा घालविण्यासाठी घरगुती उपाय

तळपायांच्या भेगा कमी करण्यासाठी घरच्याघरी क्रिम कसं तयार करायचं याविषयीचा व्हिडिओ aapli_aaji या इन्स्टाग्राम पेजवर  शेअर करण्यात आला आहे.

प्रियांका चोप्राची आई म्हणाली- "प्रियांकाला घडविताना माझ्याकडून खूप मोठ्या चुका झाल्या....", नेमकं काय चुकलं?

साहित्य

२ मेणबत्ती

१ वाटी मोहरीचे तेल

दिड वाटी खोबरेल तेल

 

 

हिवाळ्यात त्वचेला द्या केशर- बदामाचं पोषण! त्वचा होईल मऊ- चमकदार, करून पाहा १ सोपा उपाय

कापुराची १ वडी

१ वाटी कोरफडीचा गर

अर्धा टिस्पून हळद 

 

कृती

सगळ्यात आधी किसनीने मेणबत्ती किसून घ्या. त्यानंतर १ लहान आकाराची वाटी भरून किसलेली मेणबत्ती घ्या.

मेणबत्तीचा किस एका कढईमध्ये टाका. त्या कढईमध्ये कापूर, कोरफडीचा गर, हळद, मोहरीचे तेल आणि खोबरेल टाका. 

कुंडीत लावलेल्या झेंडुच्या रोपाला येतील भरपूर फुलं... २ सोपे उपाय- टपोऱ्या फुलांनी बघा कसं बहरून जाईल झाड

कढई गॅसवर गरम करायला ठेवा. मंद गॅसवर हे मिश्रण हलवत राहा. १० ते १५ मिनिटांनंतर हे मिश्रण एकदम पारदर्शक होईल. तसं पारदर्शक मिश्रण झालं की मग गॅस बंद करा. १५ ते २० मिनिटांनी हे मिश्रण थंड होईल आणि त्याचं घट्ट क्रिम तयार होईल. 

हे क्रिम एका एअरटाईट डबीमध्ये भरून ठेवा.

रोज रात्री तळपाय स्वच्छ धुवा आणि नंतर हे क्रिम लावा. त्यानंतर पायात सॉक्स घाला. ८ दिवसांतच तळपाय एकदम मुलायम होतील. 

 

Web Title: How to heel cracked heel? Home remedies for softening cracked heel, homemade cream for cracked heel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.