थंडी पडली की अनेक जणींच्या तळपायाला खूप मोठ्या मोठ्या भेगा पडतात. पायात चप्पल, सॉक्स वापरले तरी भेगा पडतातच. अनेक जणींच्या या भेगा एवढ्या वाढतात की त्यामधून रक्त येऊ लागते. अगदी टाच जमिनीवर ठेवलं तरी भेगा ठणकतात (How to heel cracked heel?). बऱ्याचदा महागडे क्रिम वापरूनही म्हणावा तसा फरक पडत नाही. तुमच्याही बाबतीत असंच काहीसं झालं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (Home remedies for softening cracked heel). आजीबाईंच्या बटव्यातला हा एक खास नुस्का तुमच्या पायांना बघा आठवडाभरातच कसं मऊ- मुलायम करून टाकेल (homemade cream for cracked heel)....
तळपायांच्या भेगा घालविण्यासाठी घरगुती उपाय
तळपायांच्या भेगा कमी करण्यासाठी घरच्याघरी क्रिम कसं तयार करायचं याविषयीचा व्हिडिओ aapli_aaji या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
साहित्य
२ मेणबत्ती
१ वाटी मोहरीचे तेल
दिड वाटी खोबरेल तेल
हिवाळ्यात त्वचेला द्या केशर- बदामाचं पोषण! त्वचा होईल मऊ- चमकदार, करून पाहा १ सोपा उपाय
कापुराची १ वडी
१ वाटी कोरफडीचा गर
अर्धा टिस्पून हळद
कृती
सगळ्यात आधी किसनीने मेणबत्ती किसून घ्या. त्यानंतर १ लहान आकाराची वाटी भरून किसलेली मेणबत्ती घ्या.
मेणबत्तीचा किस एका कढईमध्ये टाका. त्या कढईमध्ये कापूर, कोरफडीचा गर, हळद, मोहरीचे तेल आणि खोबरेल टाका.
कढई गॅसवर गरम करायला ठेवा. मंद गॅसवर हे मिश्रण हलवत राहा. १० ते १५ मिनिटांनंतर हे मिश्रण एकदम पारदर्शक होईल. तसं पारदर्शक मिश्रण झालं की मग गॅस बंद करा. १५ ते २० मिनिटांनी हे मिश्रण थंड होईल आणि त्याचं घट्ट क्रिम तयार होईल.
हे क्रिम एका एअरटाईट डबीमध्ये भरून ठेवा.
रोज रात्री तळपाय स्वच्छ धुवा आणि नंतर हे क्रिम लावा. त्यानंतर पायात सॉक्स घाला. ८ दिवसांतच तळपाय एकदम मुलायम होतील.