Join us  

How To Identify Fake Cosmetics: सुंदर दिसण्यासाठी जे कॉस्मेटिक्स वापरता ते नकली तर नाही ? 4 पद्धतीने ओळखा बनावट कॉस्मेटिक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 5:05 PM

Alteration in Cosmetics: पुण्यामध्ये नुकतीच लाखो रुपयांची बनावटी सौंदर्य प्रसाधने (Fake Cosmetics) जप्त करण्यात आली आहेत.. त्यामुळेच तर तुम्ही जे कॉस्मेटिक्स वापरताय, ते खरं आहे की बनावट हे एकदा तपासून पहा.

ठळक मुद्देआपण एवढे पैसे मोजून घेतलेले सामान नकली निघू नये, यासाठी आता ग्राहकांनीच सतर्क राहणे गरजेचे झाले आहे..

आजकाल शाळकरी मुलींपासून ते वृद्ध स्त्रियांपर्यंत प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतेच. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांचे मार्केट (cosmetics market) खूप प्रचंड वाढले आहे. एखाद्या लहान शहरातही कॉस्मेटिक्स उद्योगात महिन्याकाठी कित्येक करोडोंची उलाढाल होत असते. जिथे पैसे तिथे बनावटी व्यवहार आपसूकच येतात. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांमध्येही अलिकडच्या काळात खूपच मोठ्या प्रमाणावर बनावट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपण एवढे पैसे मोजून घेतलेले सामान नकली निघू नये, यासाठी आता ग्राहकांनीच सतर्क राहणे गरजेचे झाले आहे..

 

सौंदर्य प्रसाधनांचा खरे- खोटेपणा कसा ओळखायचा?१. ब्रँडचा लोगो आणि लेबल नीट तपासा (Logo And Lable)बनावटी कॉस्मेटिक्स न ओळखू येण्याचं कारण म्हणजे त्यावरही अगदी ओरिजनल ब्रॅण्डसारखाच लोगो आणि लेबल असते. वरवर पाहता दोन्हींच्या लोगो आणि लेबलमध्ये फरक दिसत नाही. पण जरा काळजीपुर्वक, निरखून पाहिले, तर असली आणि नकलीमधला फरक लगेच जाणवेल. त्यामुळे कॉस्मेटिक्स खरेदी करण्यापुर्वी आपल्या नेहमीच्या ब्रॅण्डचा लोगो आणि लेबल एकदा नीट बघून घ्या. फॉण्ट, साईज लक्षात ठेवा. आणि अगदी तशाच पद्धतीचा लोगो आणि लेबल ज्यावर असेल, ते खरेदी करा. थोडा जरी फरक जाणवला तरी खरेदी करणे टाळा. 

 

२. सुवास आणि टेक्स्चर बघा (fragnance & texture)प्रत्येक ब्रॅण्डच्या कॉस्मेटिक्सचा एक खास सुवास असतो. तसेच त्याचे टेक्स्चरही आपल्याला माहिती असते. त्यामुळे सुवास आणि टेक्स्चर या दोन गोष्टी तपासूनच खरेदी करा. जर तुम्ही एखादा ब्रॅण्ड पहिल्यांदाच वापरणार असाल तर इंटरनेटवर त्या ब्रॅण्डच्या ऑफिशियल साईटवरून आधी व्यवस्थित माहिती घ्या आणि नंतरच खरेदी करा.

 

३. डिस्काऊंटमुळे होऊ शकतो घातउच्च प्रतीचे दर्जेदार कॉस्मेटिक्स नेहमीच महाग असतात. त्यांच्यावर फारफार तर १० ते १५ टक्के डिस्काऊंट मिळू शकतो. जर एखादे महागडे ब्रॅण्डेड कॉस्मेटिक्स ४० टक्के, ५० टक्के ऑफ अशा ऑफरवर मिळत असेल, तर नक्कीच ते नकली असू शकते. डिस्काऊंटचा मोह करू नका. त्याऐवजी अशावेळी त्या ब्रॅण्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ब्रॅण्ड सध्या काही ऑफर देत आहे का हे तपासा आणि त्यानंतरच खरेदी करा. 

४. बारकोड बारकाईने बघाप्रत्येक ब्रॅण्डेड आणि ओरिजनल उत्पादनांवर त्यांचा स्वतंत्र बारकोड आणि सिरियल नंबर असतो. ज्यावर बारकोड आणि सिरियल नंबर नसतोच किंवा ओळखू न येण्यासारखा अस्पष्ट असेल तर ते प्रोडक्ट घेणे टाळावे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सखरेदी