लिपस्टीक ही अनेकींसाठी अतिशय गरजेच्या वस्तूंपैकी एक असते. कुठेही बाहेर जायचं म्हटलं की ओठांवर लिपस्टीक फिवून आपण झटपट तयार होतो आणि निघतो. लिपस्टीक ही अनेकींसाठी अतिशय आवडीची गोष्ट असते. त्यामुळे वेगवेगळ्या रंगाच्या, ब्रँडच्या लिपस्टीक खरेदी करणे तरुणींना आणि महिलांना आवडते. ज्यांना लिपस्टीक आवडते त्यांच्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये किंवा बॅगमध्ये एखादी तरी लिपस्टीक आवर्जून सापडतेच. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे घरातून बाहेर पडताना जरी लिपस्टीक लावली तरी अपेक्षित ठिकाणी पोहचेपर्यंत किंवा पोहचल्यावर काही वेळातच ही लिपस्टीक अतिशय फिकी झालेली असते किंवा गेलेली असते. त्यामुळे आपल्याला त्याठिकाणी पुन्हा वॉशरुममध्ये जाऊन लिपस्टीक लावावी लागते. मग खूप बोलणे झाले किंवा खाणे-पिणे झाले की पुन्हा लिपस्टीक गेलेली असते. त्यामुळे आपल्याला सतत लक्ष ठेवून टच अप करत राहावे लागते. त्यामुळेच आज आपण एक अशी हॅक पाहणार आहोत ज्यामुळे आपली लिपस्टीक बराच काळ ओठांवर आहे तशीच टिकून राहू शकते (How to keep Lipstick for Long Time Easy Trick of Hack).
ट्रान्सफर प्रूफ लिपस्टीकचा पर्याय
बाजारात ट्रान्सफर प्रूफ लिपस्टीक या प्रकारातील लिपस्टीक मिळतात. या लिपस्टीक लगेच जात नाहीत त्यामुळे तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला किंवा समारंभाला हजेरी लावायची असेल तर अशा प्रकारची लिपस्टीक तुम्ही आवर्जून घेऊ शकता. या लिपस्टीक काही प्रमाणात महाग असतात मात्र त्या लॉँग लास्टींग असल्याने पैसे वसूल असतात. मात्र दरवेळी आपण इतकी इन्व्हेस्टमेंट करु शकतोच असे नाही. त्यासाठीच एक खास ट्रीक पाहूया...
नेहमीचीच लिपस्टीक जास्त काळ टिकावी यासाठी सोपी हॅक
आपण साधारणपणे मॅट प्रकारातील लिपस्टीक नेहमीसाठी वापरतो. ही लिपस्टीक लावून आपण काही खाल्ले किंवा प्यायले तर लगेचच ती लिपस्टीक निघून जाते. अशावेळी लिपस्टीक लावल्यानंतर त्यावर थोडीशी कॉम्पॅक्ट पावडर लावली तर ती लिपस्टीक अजिबात निघत नाही आणि ती ट्रान्सफर प्रूफ होते. लिपस्टीक आहे त्यापेक्षाही मॅट फिनिशिंग असल्यासारखी दिसते. खूप ऑयली जेवण जेवल्यावर ही लिपस्टीक थोडी फिकट होते पण ती नेहमीसारखी खूप जास्त निघून जात नाही. तुम्ही लिपस्टीक लावून काहीच खाल्ले किंवा प्यायले नाही तर साधारण ५ ते ६ तास तुमची लिपस्टीक छान टिकून राहते. इतकेच नाही तर साध्या ब्रँडची स्वस्तातील लिपस्टीक असेल तरीही तुम्ही ही ट्रीक नक्की वापरु शकता.