Join us  

चेहरा सतत ड्राय-कोरडा दिसतो? क्रिती सेनॉन सांगते या खास'पांढऱ्या' फेसमास्कची कमाल-चेहरा चमकतो सतत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2024 12:59 PM

How To Keep Skin Hydrated : Kriti Sanon's Morning Skincare Routine Hydration and Radiance : Best Hydrating Face Mask : त्वचा सारखी कोरडी पडते म्हणून लोशन, क्रिम, मॉइश्चरायझर लावण्यापेक्षा वापरा हा घरगुती फेसमास्क...

आपल्या शरीराप्रमाणेच आपल्या त्वचेला देखील पाण्याची तितकीच गरज असते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी त्वचेत योग्य प्रमाणात ओलावा टिकून राहणे आवश्यक असते. आपल्यापैकी काहीजणींची त्वचा फारच कोरडी असते. हवामानातील बदलानुसार स्किन अधिक कोरडी पडण्याचे प्रमाण वाढू शकते. त्वचा वारंवार कोरडी पडू नये म्हणून आपण सतत लोशन, क्रिम, मॉइश्चरायझर लावतो. परंतु काहीवेळ कोरड्या स्किनसाठी असे अनेक उपाय करून देखील काहीच उपयोग होत नाही. यामुळे त्वचा अधिकच कोरडी झाल्याने त्यावर खाज येणे, एलर्जी होणे अशा समस्या उद्भवू शकतात(Kriti Sanon's Morning Skincare Routine Hydration and Radiance).

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिण्यासोबतच तुम्ही इतरही अनेक घरगुती उपाय (Best Hydrating Face Mask) करु शकता. नैसर्गिक पद्धतीने त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण एका खास घरगुती फेसमास्कचा (Navratri 2024 Day 5 : White Facemask For Skin Hydration) वापर करु शकता. या फेसमास्कचा वापर केल्याने आपली त्वचा हायड्रेटेड (Face masks to keep your skin hydrated) तर होतेच पण यासोबतच स्किन ब्राइटनिंग, स्किन टाइटनिंग आणि त्वचेला सखोल पोषण देते व एजिंगच्या खुणा कमी करण्यास मदत करते. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन(Kriti Sanon) देखील तिच्या स्किन केअर रुटीनमध्ये या पांढऱ्या मास्कचा आवर्जून समावेश करते. हा बहुगुणी फेसमास्क कसा तयार करायचा व तो वापरण्याने त्वचेला कोणते फायदे मिळतात ते पाहूयात(How To Keep Skin Hydrated).   

साहित्य :- 

१. तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून २. दही - २ टेबलस्पून ३. मध - १ टेबलस्पून 

फेसमास्क कसा तयार करायचा ? 

एका बाऊलमध्ये प्रत्येकी एक टेबलस्पून तांदुळाचे पीठ, मध आणि दोन टेबलस्पून दही घ्यावे. हे सगळे जिन्नस घेऊन ते व्यवस्थित चमच्याच्या मदतीने हलवून एकजीव करुन घ्यावे. आपला फेसमास्क स्किनवर लावण्यासाठी तयार आहे. 

करीनासारखी मऊ-मुलायम स्किन हवी? वापरा 'हा' नारंगी रंगाचा फेसमास्क, स्किन होईल मलईसारखी मुलायम...

अथिया शेट्टी स्किन टाईटनिंगसाठी वापरते हा राखाडी फेसमास्क! ऐन तारुण्यात त्वचेवर सुरकुत्या येणार नाहीत...

फेसमास्क कसा वापरावा ? 

हा तयार केलेला पांढऱ्या रंगाचा फेसमास्क आपल्या चेहऱ्यावर ब्रशच्या मदतीने लावून घ्यावा. त्यानंतर १५ मिनिटे किंवा हा फेसमास्क संपूर्णपणे सुकेपर्यंत स्किनवर लावून ठेवावा. १५ ते २० मिनिटानंतर आपल्या हातांनी स्किनला मसाज करुन घ्यावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.  

लग्न ठरलंय-चेहऱ्यावर हवा सिलेब्रिटींसारखा ग्लो? वापरा 'हा' खास फेसमास्क, ब्रायडल ग्लो येईल...

हा फेसमास्क वापरल्याने नेमके कोणते फायदे मिळतात ? 

१. तांदुळाचे पीठ :- आपल्या त्वचेसाठी तांदळाचे पीठ अत्यंत फायदेशीर असते. तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठीच नव्हे, तर त्वचेच्या आरोग्यासाठीही वापरले जातात. तांदुळाच्या पिठामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन डीसह फायबरची मात्रा भरपूर आहे. तसंच यामध्ये अतिरिक्त प्रमाणात लोह व थायमीन यासारख्या पोषक घटकांचाही समावेश असतो. या सर्व पोषण तत्त्वांमुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते 

२. दही :- दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक्स त्वचेचे जंतूंपासून संरक्षण करतात, ज्यामुळे पिंपल्सची समस्या कमी होते. त्वचेसाठी दही नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते, यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे त्वचेला ओलावा मिळतो, यामुळे त्वचा मऊ राहते.      

३. मध :- आपला स्किन टोन खराब झाल्यास स्किन टोन एकसमान करण्यासाठी मध फायदेशीर ठरते. त्वचेतील  पेशींची हिलिंग प्रोसेस वेगवान करण्यासाठी मधाचा वापर करू शकतो. त्वचेवर येणार्‍या पिंपल, ब्लॅकहेड्स या समस्यावर मध वापरणे हा सर्वात उत्तम उपाय आहे.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४नवरात्रीब्यूटी टिप्सत्वचेची काळजीक्रिती सनॉन