Join us

उन्हामुळे गरम झालेल्या टाकीतील पाण्याचे चटके लागतात? टाकी थंड ठेवण्यासाठी करा हा उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:37 IST

Viral Video : टाकीतील पाणी थंड ठेवण्यासाठी काय कराल यावर एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Viral Video : एप्रिल महिन्यात तापमान ४० डिग्रीच्या वर केलं असून मे महिन्यात काय होईल याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. जसजसा उकाडा वाढत आहे तसतशा वेगवेगळ्या समस्याही वाढत आहे. सामान्यपणे उन्हाळ्यात सगळ्यांनाच भेडसावणारी एक समस्या म्हणजे टेरेसवर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतील पाणी गरम होणे. उन्हामुळे हे पाणी इतकं गरम होतं की, वापरताही येत नाही. अशात टाकीतील पाणी थंड ठेवण्यासाठी काय कराल यावर एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

उन्हाळ्यात टेरेसवरील टाकीतील पाणी गरम होणं ही एक कॉमन समस्या आहे. अशात ही समस्या दूर करण्यासाठी यूट्यूबर पूनम देवनानी यांनी टाकीतील पाणी कडक उन्हातही कसं थंड राहील यासाठी सोपा उपाय सांगितला आहे. जो सहजपणे तुम्ही घरीच करू शकता.

लागणारं साहित्य

थर्माकॉल

कात्री-टेप

धान्याचं रिकामं पोतं

प्लास्टिक किंवा कोणतीही

कसा कराल उपाय?

टाकीचा आणि टाकीतील पाण्याचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सगळ्यात आधी पाण्याची टाकी एखाद्या शेडखाली ठेवा. त्यानंतर टाकीला सगळ्या बाजूने थर्माकॉलनं कव्हर करा. यासाठी टेपची मदत घ्या. थर्माकॉल शीट पातळ घ्याल तर लावायला सोपं पडेल.

पोतं बांधा

टाकीतील पाणी थंड ठेवण्यासाठी दुसरी स्टेपमध्ये टाकीला थर्माकॉल लावून झाल्यावर त्यावर धान्याचं रिकामं पोतं दोरीच्या मदतीनं बांधा. या पोत्यावर रोज सकाळी पाणी टाकलं तर टाकीतील पाणी सुद्धा थंड राहणार.

शेवटी काय कराल?

आता राहिलं टाकीचं झाकण. तर टाकीचं झाकण गरम होऊ नये म्हणून तुम्ही कार्डबोर्डचा वापर करू शकता. यासाठी कार्डबोर्ड झाकणाच्या आकाराचं गोल कापून घ्या आणि ते झाकणावर ठेवा. त्यावर एखादी जड वस्तू ठेवा जेणेकरून कार्डबोर्ड उडणार नाही. 

टॅग्स :सोशल व्हायरलजरा हटके