Join us  

काजळ पसरण्याची भीती वाटते? ५ भन्नाट टिप्स, डोळे दिसतील टपोरे, काजळ पसरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2023 5:38 PM

How to Keep Your Kajal Smudge Proof, 5 Simple Tips परफेक्ट 'काजळ' लावण्यासाठी काही खास टिप्स

महिलेचं सौंदर्य तिच्या टपोऱ्या डोळ्यात दडलेलं असतं. त्यावर जर काजळ लावलं तर, आहा!! सौंदर्याला चारचांद लागतात. 'रोज़ रोज़ आँखों तले एक ही सपना चले, रात भर काजल जले, आँख में जिस तरह, ख़्वाब का दिया जले' डोळ्यांवर आणि काजळवर अनेक थोर व्यक्तींनी गाणी - शायरी लिहून ठेवली आहे.

काजळ हे डोळ्यांचे सौंदर्य खुलविण्याचा एक महत्वाचा शृंगार आहे. डोळे अधिक आकर्षक दिसावते म्हणून अनेक महीला काजळ हमखास लावतात. यामुळे चेहरा खुलून दिसतो. पण अनेकदा काजळ पसरते. आपण देखील काजळ पसरण्याच्या भीतीने ते लावणे टाळत असाल तर, चिंता सोडा. काही खास टिप्स फॉलो करा. यामुळे काजळ पसरणार नाही. दिवसभर डोळ्यांभोवती टिकून राहील(How to Keep Your Kajal Smudge Proof, 5 Simple Tips ).

काजळ लावण्यासाठी खास टिप्स

- काजळ लावताना किंवा लावल्यानंतर लगेच पसरत असेल तर, डोळ्यांखाली कंसीलर लावा. असे केल्याने काजळ कधीही पसरणार नाही.

- जर आपल्याकडे कंसीलर नसेल, तर त्याला ऑप्शन म्हणून आपण लूज पावडरचा वापर करू शकता. आपल्याला फक्त डोळ्यांखाली पावडर लावून ब्लेंड करायचे आहे. त्यानंतर डोळ्यांवर बारकाईने काजळ लावायचे आहे.

चेहऱ्यावर चमचाभर दुधाची साय लावा; दिसाल तरूण-सुंदर, मिळतील फायदेच फायदे

- आधी डोळ्यांना काजळ लावा. नंतर त्वचेच्या टोननुसार डोळ्यांखाली फाउंडेशन लावा. मग ते सेट करण्यासाठी सोडा. आपण त्याजागी बीबी क्रीमचा देखील वापर करू शकता. यामुळे काजळ पसरणार नाही.

- डोळ्यांवर जाडसर काजळ लावयचे असेल तर, स्मज-फ्री काजळ पेन्सिलचा वापर करा. काजळच्या क्वालिटीवर देखील सौंदर्य अवलंबून असते. नेहमी चांगल्या कंपनीच्या काजळचा वापर करा. यामुळे डोळ्यांना इजा होणार नाही.

१ चमचा मेथीचे दाणे आणि ३ उपाय -केसातला कोंडा-पांढरे केस-समस्या गायब

- तेलकट त्वचा हे काजळ पसरण्याचे मुख्य कारण आहे. तेलकट त्वचेमुळे काजळ आय-लिड्सवर पसरते. काजळ पसरू नये म्हणून थंड पाण्याने डोळे आणि पापण्या पुसा. त्यानंतर कोरडे होऊ द्या. असे केल्याने, आपल्या डोळ्याभोवती तेलकटपणा राहणार नाही, व काजळ देखील पसरणार नाही.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमेकअप टिप्स