कधी कधी आपला चेहरा खूपच प्रौढ दिसू लागतो. त्वचा रापलेली दिसते. चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स वाढतात. शिवाय त्वचेवर फाईन लाईन्सही दिसू लागतात. असं सगळं झालं की मग आपण आहोत त्यापेक्षा जास्त वयाचे दिसू लागतो. मग त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आपण वेगवेगळे फेसमास्क, क्रिम वापरून पाहातो (how to keep your skin young and glowing?). त्याचा परिणाम थोडे दिवस दिसतो आणि नंतर निघून जातो. म्हणूनच नैसर्गिक पद्धतीने त्वचेला आतून पोषण देऊन तरुण ठेवायचं असेल तर हा एक सोपा व्यायाम करून पाहा (home remedies for reducing fine lines). हा एका मिनिटाचा उपाय तुमच्या त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवण्यास निश्चितच मदत करेल...(best face yoga for young looking skin)
त्वचा तरुण, चमकदार ठेवण्यासाठी उपाय
त्वचा तरुण, चमकदार ठेवण्यासाठी कोणता उपाय करावा, याविषयीची माहिती योगअभ्यासकांनी lin.ra17 या इन्स्टाग्राम पेजवर सुचवली आहे.
केसांची चमक जाऊन कोरडे झाले? 'या' पद्धतीने राईस वॉटर लावा; केस होतील मऊ- चमकदार
यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की हा उपाय करण्यासाठी दिर्घ श्वास घ्या. त्यानंतर १० सेकंदांसाठी श्वास रोखून ठेवा आणि तुमच्या चेहऱ्याचे सगळे स्नायू आकसून घ्या. त्यानंतर हळूहळू श्वास घेत चेहरा रिलॅक्स करा.
हा उपाय साधारण ५ ते ६ वेळा रिपिट करा. अगदी बसल्याबसल्या करता येण्यासारखा हा एक सोपा उपाय आहे.
हा उपाय केल्यामुळे होणारे फायदे
हा उपाय केल्यामुळे चेहऱ्यावर असणारे ५० पेक्षाही जास्त स्नायू आकुंचित होतात. हा त्यांच्यासाठी एक प्रकारचा व्यायाम आहे. यामुळे रक्ताभिसरण क्रिया अधिक चांगली होते.
तुमच्यावर कोणी विनाकारण चिडत असेल तर काय कराल? बीके शिवानी सांगतात खास उपाय
चेहऱ्याच्या त्वचेखाली उत्तम पद्धतीने रक्ताभिसरण झाल्यामुळे त्वचेला चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे त्वचा चमकदार होते.
हा एक फेसयोगाचा प्रकार आहे. त्यामुळे तो नियमितपणे केल्यास चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.