Lokmat Sakhi >Beauty > ५५ वर्षीय भाग्यश्रीनं सांगितलं नवीन वर्षात फिट राहण्याचं सिक्रेट; ४ पदार्थ खा; कायम तरूण दिसाल

५५ वर्षीय भाग्यश्रीनं सांगितलं नवीन वर्षात फिट राहण्याचं सिक्रेट; ४ पदार्थ खा; कायम तरूण दिसाल

How To Keep Yourself Fit In 2025 : ती आपल्या फॅन्सना इन्सपायर करण्याची एकही संधी सोडत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 21:28 IST2025-01-03T21:23:33+5:302025-01-03T21:28:53+5:30

How To Keep Yourself Fit In 2025 : ती आपल्या फॅन्सना इन्सपायर करण्याची एकही संधी सोडत नाही.

How To Keep Yourself Fit In 2025 : Actress Bhagyashree Tells Weight Loss Tips For New Year | ५५ वर्षीय भाग्यश्रीनं सांगितलं नवीन वर्षात फिट राहण्याचं सिक्रेट; ४ पदार्थ खा; कायम तरूण दिसाल

५५ वर्षीय भाग्यश्रीनं सांगितलं नवीन वर्षात फिट राहण्याचं सिक्रेट; ४ पदार्थ खा; कायम तरूण दिसाल

अभिनेत्री भाग्यश्री हेल्थ आणि फिटनेसबाबत बरीच जागरूक असते. वेळोवेळी ती आपल्या फॅन्सना फिटनेस टिप्स आणि ट्रिक्स देत असते.हेल्दी इटींग, एंटी एजिंगपासून, स्किन केअर वर्कआऊटबाबत ती कोणतीही कसर मागे ठेवत नाही. ती आपल्या फॅन्सना इन्सपायर करण्याची एकही संधी सोडत नाही. (How To Keep Yourself Fit In 2025) नवीन वर्षांच्या सुरूवातीला  आपल्या फॅन्सना काही फिटनेस टिप्स दिल्या आहेत.

भाग्यश्रीचा फिटनेस आणि एजलेस ब्युटी पाहून तुम्हाला विश्वास होणार नाही. भाग्यश्री नेहमी हेल्दी फूड्सचे सेवन करते. ती ५५ वर्षांची असून ती नेहमी हेल्दी फूड्सचे सेवन करते. जे एंटी एजिंग गुणांसाठी ओळखले जाते. भाग्यश्रीनं इंस्टाग्राम सिरीज, ट्युजडे टिप्स विथ बी यांत त्यांनी काही हेल्थ टिप्स सांगितल्या आहेत.  ज्यामुळे नवीन  वर्षात हेल्दी राहण्यास मदत होईल.

हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी सांगितले की, शरीराच्या गरजांनुसार संकल्प समजून घ्यायला हवेत. शरीरात काही गडबड असेल तर भावनात्मक संकेत देतात. शरीराच्या संकेतांकडे लक्ष दिल्यास शारीरिक समस्या टाळण्यास मदत होईल. भाग्यश्री सांगतात की डोळ्यांखाली किंवा पायांमध्ये झिनझिण्या येत  असतील तर मॅग्नेशियमची कमतरता असू शकते.

यावर उपाय म्हणून भाग्यश्री यांनी आपल्या आहारात बदाम, सुर्यफुलाच्या बीया, पालकाचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. भाग्यश्री सांगतात की तुम्हाला चिडचिडेपणा किंवा राग येत असेल व्हिटामीन बी ची कमतरता असू शकते. यासाठी राजमा, छोले, शेंगदाणे, खाण्याचा सल्ला दिला जातो. थोडावेळ ऊन्हात उभं राहा.
नखं तुटणं हे आयर्नच्या कमतरतेचं लक्षण आहे. शाकाहारी लोकांनी आयर्नची कमतरता  पूर्ण करण्यासाठी पालक, बीट, गुळाचे सेवन करा.

मांसपेशीच्या विकासासाठी पोटॅशियम गरजेचे असते. यासाठी आपल्या आहारात केळी, नारळपाणी, बटाटा या पदार्थांचा समावेश करा.बदामाचे सेवन केल्यानं बरेच फायदे मिळतात. बदाम खाल्ल्यानं शरीराला अतिरिक्त फायदे मिळतात. बदाम, पालक यातून व्हिटामीन्स, मिनरल्स मिळतात.  ज्यामुळे त्वचेच्या पेशींना पोषण मिळते. ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसता आणि शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात.

Web Title: How To Keep Yourself Fit In 2025 : Actress Bhagyashree Tells Weight Loss Tips For New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.