Join us  

खोबरेल तेल शुद्ध आहे की भेसळ आहे, कसे ओळखाल? ४ सोप्या टिप्स, भेसळ कळेल झटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 5:32 PM

4 Simple tips to check the purity of coconut oil at home खोबरेल तेल खायला वापरतो पण त्यात भेसळ तर नाही हे कसे ओळखाल?

खोबरेल तेल केस आणि स्किनसाठी फायदेशीर आहे. हे तेल त्वचा आणि केसांच्या संबंधित समस्येवर दोन हात करण्यास मदत करते. यामध्ये मुरुम, स्ट्रेच मार्क्स आणि कोरडे रुक्ष केस या समस्यांचा समावेश होतो. नारळाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे हिवाळ्यातही तुमची त्वचा सुंदर आणि मुलायम राहते.

खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत. मात्र, खोबरेल तेलात देखील भेसळ केली जाते. ही भेसळ ओळखायची कशी असा प्रश्न उद्भवतो. नफा मिळवण्यासाठी अनेक जण भेसळयुक्त तेलाची विक्री करतात. भेसळयुक्त तेलाचा वापर केल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होतो. हे परिणाम रोखण्यासाठी आपण तेलामधील भेसळ ओळखणे आवश्यक आहे.

खोबरेल तेल ओळखण्याची पद्धत..

- एक पॅन घ्या आणि गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. त्यानंतर थोडे खोबरेल तेल घालून गरम करा. जर कमी तापमानात फेस येत असेल आणि जळण्याचा वास येत असेल तर, ते तेल बनावट आहे हे समजून जा.

- एका बाटलीत थोडे खोबरेल तेल घ्या. हे तेल तासभर फ्रीजमध्ये ठेवा. जर भेसळ खोबरेल तेलावर थराच्या स्वरूपात तरंगताना दिसून येत असेल तर ते बनावट तेल आहे असे समजून जा.

- हातावर थोडं खोबरेल तेल घ्या आणि आधी त्याचा वास घ्या. यानंतर तोंडात खोबरेल तेल टाका. वास आणि चव चांगली असेल खोबरेल तेल खरी आहे, नाहीतर ती नकली आहे हे समजून जा.

- खोबरेल तेल बनावट किंवा भेसळयुक्त असेल तर ते तुम्हाला थोडेसे पिवळसर दिसेल. रंगावरून देखील तुम्ही तेलाची पारख करू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीत्वचेची काळजी