Join us  

काळ्याकुट्ट अंडरआर्म्स? १ चमचाभर टूथपेस्टची पाहा कमाल; काही दिवसात दिसेल फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 3:27 PM

How to lighten and prevent underarm darkness by using Toothpaste : काखेतील काळेपणा वाढण्याआधी करा कमी, अन्यथा डाग होतील हट्टी, आणी..

काही दिवसात गरमीचा सिझन सुरु होईल. उन्हाळा हा ऋतू अनेकांना आवडतो. या दिवसात आपण गरम कपडे कपाटात ठेवून सुती, स्लिव्जलेस कॉटनचे कपडे घालतो. पण काही लोकं स्लिव्जलेस कपडे घालणं टाळतात. त्याला २ कारणं आहेत. एक म्हणजे स्किन टॅन होत असल्यामुळे लोकं स्लिव्जलेस कपडे घालणं टाळतात (Black Underarms). तर काही महिला काखेतील काळेपणामुळे स्लिव्जलेस ड्रेस घालणं टाळतात. काखेतल्या काळेपणामुळे आपण बऱ्याचदा हातांची हालचाल कमी करतो (Skin Care Tips).

काखेतील काळेपणा घालवण्यासाठी केमिकल उत्पादनांचा वापर करण्याऐवजी टूथपेस्टचा वापर करू शकता. टूथपेस्टचा वापर फक्त दात चमकवण्यासाठी नसून, काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी देखील करू शकता(How to lighten and prevent underarm darkness by using Toothpaste).

काखेतील काळेपणा घालवण्यासाठी टूथपेस्टचा करा असा वापर

लागणारं साहित्य

तांदुळाच पीठ

टूथपेस्ट

कच्चे दूध

अशा पद्धतीने तयार करा पेस्ट

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक चमचा टूथपेस्ट घ्या. त्यात एक चमचा तांदुळाचं पीठ आणि २ चमचे कच्चे दूध घालून मिक्स करा. तयार पेस्ट काखेत लावा. ४ ते ५ मिनिटं हाताने रगडा. ५ मिनिटानंतर आपण पाण्याने पेस्ट काढू शकता. या उपायाचा वापर आपण आठवड्यातून २ वेळा करू शकता.

ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? ५ रुपयांच्या कडीपत्त्यात मिसळा एक काळं पाणी, शायनिंग केसांच सुपर सिक्रेट..

लिंबू

लिंबाच्या वापराने आपण काखेतील काळेपणा काढू शकता. यासाठी आंघोळीपूर्वी लिंबाचा रस काखेत लावा. नंतर लिंबाच्या सालीने ३ ते ४ मिनिटांसाठी चोळा. लिंबू काखेत चोळल्यानंतर सामान्य पाण्याने धुवा. यामुळे काखेतील काळेपणा निघेल. शिवाय काही दिवसात फरक दिसेल.

जाता जात नाही हट्टी डार्क सर्कल? मधात मिसळा फक्त २ गोष्टी, काळी वर्तुळे गायब-डोळे दिसतील टपोरे

खोबरेल तेल

केस आणि त्वचेसाठी खोबरेल तेल फायदेशीर ठरते. नैसर्गिक पद्धतीने जर त्वचा उजळवायची असेल तर, आपण खोबरेल तेलाचा वापर करू शकता. यासाठी खोबरेल तेलाने अंडरआर्म्सची मालिश करा. त्यानंतर पाण्याने धुवा. यात त्वचा उजळवणारे एजंट, व्हिटॅमिन ई आढळते. ज्यामुळे स्किन क्लिअर होते. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स