Join us  

कोपर - गुडघ्यांचा काळेपणा वाढतच चालला आहे? दह्यात मिसळा २ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात दिसेल फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2024 10:00 AM

How to lighten dark knees and elbows at home : कोपर - गुडघ्यांचा काळेपणा वाढतच जात असेल तर, महागड्या उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय बरे..

जेव्हा त्वचेची काळजी घेण्याची वेळ येते, तेव्हा लोक चेहऱ्याकडे जास्त लक्ष देतात (Skin Care Tips). पण कोपर आणि गुडघ्यांची काळजी घेणे विसरतात. या ठिकाणी काळे डाग निर्माण होतात, आणि हे काळे डाग काही केल्या लवकर निघतही नाही. कोपरे, काख, गुडघ्यांचा काळेपणा वाढत जाण्यामागे अनेक कारणे असू शकतात (Darken Skin). कडक सूर्यप्रकाश, त्वचारोग, डेड स्किन यामुळे त्या भागातील काळेपणा वाढत जातो (Home Remedy). यापासून सुटका मिळण्यासाठी आपण विविध प्रकारचे क्रीम आणि इतर उत्पादनांचा वापर करतो. पण यातूनही विशेष फायदा होत नाही.

जर आपल्याला गुडघे आणि कोपरावरील काळेपणा दूर करायचं असेल तर, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जयश्री शरद यांनी सांगितलेली एक होम रेमेडी करून पाहा. दह्यात दोन गोष्टी मिसळून लावल्याने हा काळेपणा दूर होतो. पण दह्याचा वापर काळेपणा दूर करण्यासाठी कसा करावा? पाहूयात(How to lighten dark knees and elbows at home).

गुडघे आणि कोपरावरील काळेपणा दूर करण्यासाठी दह्याचा करा असा वापर

लागणारं साहित्य

आमरस करणं किचकट काम वाटतं? इन्स्टंट आमरसाची पाहा सोपी कृती; ५ मिनिटात पातेलंभर रस..

दही

हळद

एलोवेरा जेल

पेस्ट बनवण्याची पद्धत-

पेस्ट बनवण्यासाठी प्रथम एका छोट्या भांड्यात दही आणि हळद घालून चांगले मिसळा.

आता या मिश्रणात एलोवेरा जेल घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

तांदुळात खूप कीड - अळ्या झाल्या? हिंगाचा करा सोपा उपाय; तांदुळाभोवती कीड फिरकणारही नाही

तयार पेस्ट कोपर आणि गुडघ्यांवर लावा. नंतर काही वेळ स्क्रब करत राहा.

१० ते १५ मिनिटानंतर कोपर आणि गुडघे कोमट पाण्याने धुवा आणि टॉवेलच्या मदतीने कोरडे करा.

स्किनसाठी दही, हळद आणि एलोवेरा जेलचा वापर

- दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड आढळते, जे गुडघे आणि कोपरावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास, व गडद भागांचा रंग हलका करण्यास मदत करू शकते.

- हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे गुडघे आणि कोपरावरचे गडद रंग हलके करण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

- कोरफडमध्ये हायड्रेटिंग गुणधर्म असतात. जे त्वचेला मॉइश्चरायझ करते. याच्या वापराने गुडघे आणि कोपरांच्या त्वचेवरील मृत त्वचा काढण्यास मदत होते.

टॅग्स :समर स्पेशलब्यूटी टिप्सत्वचेची काळजी