Lokmat Sakhi >Beauty > काखेतला काळेपणा वाढतोच आहे? करा कॉफी पावडरचा सोपा उपाय-मान-गळा-काख दिसेल स्वच्छ

काखेतला काळेपणा वाढतोच आहे? करा कॉफी पावडरचा सोपा उपाय-मान-गळा-काख दिसेल स्वच्छ

How to Lighten Underarms: Natural Remedies and know how to use this : काखेतल्या काळेपणामुळे स्लिव्ह्जलेस ड्रेस घालणं टाळताय? ३ सोपे घरगुती उपाय करून पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2024 02:13 PM2024-06-17T14:13:03+5:302024-06-17T14:14:12+5:30

How to Lighten Underarms: Natural Remedies and know how to use this : काखेतल्या काळेपणामुळे स्लिव्ह्जलेस ड्रेस घालणं टाळताय? ३ सोपे घरगुती उपाय करून पाहा

How to Lighten Underarms: Natural Remedies and know how to use this | काखेतला काळेपणा वाढतोच आहे? करा कॉफी पावडरचा सोपा उपाय-मान-गळा-काख दिसेल स्वच्छ

काखेतला काळेपणा वाढतोच आहे? करा कॉफी पावडरचा सोपा उपाय-मान-गळा-काख दिसेल स्वच्छ

साधारणपणे आपल्या अंडरआर्म्सचा रंग आपल्या त्वचेच्या रंगाशी जुळतो (Darken Armpit). पण कधी कधी आपले अंडरआर्म्स काळवंडतात. ज्यामुळे आपण स्लिव्ह्जलेस ड्रेस घालणं टाळतो. काखेतला काळेपणा घालवणं तसं सोपं नाही, आणि हा काळेपणा अनेक कारणांमुळे निर्माण होतात (Beauty Tips). बऱ्याचदा वॅक्सिंग केल्यानंतरही काखेतला काळेपणा वाढतो. यावर उपाय म्हणून आपण विविध प्रॉडक्ट्सचा वापर करतो (Natural remedies).

पण या प्रॉडक्ट्समुळे अंडरआर्म्सचा काळेपणा अधिक वाढतो. जर आपल्याला केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करायचा नसेल तर, कॉफी पावडरचा वापर करूनही काखेतला काळेपणा घालवता येऊ शकतो. पण कॉफीचा वापर नेमका कसा करावा? यामुळे काखेतला काळेपणा दूर होऊ शकतो का? पाहूयात(How to Lighten Underarms: Natural Remedies and know how to use this).

काखेतला काळेपणा घालवण्यासाठी कॉफीचा वापर कसा करावा?

लागणारं साहित्य

दिवसातून एकदाच जेवण्याने वजन १०० टक्के घटते, पण तब्येतीवर काय भयंकर दुष्परिणाम होतात पाहा..

कॉफी

टूथपेस्ट

हळद

गुलाबजल

या पद्धतीने घालवा काखेतला काळेपणा

एका बाऊलमध्ये एक चमचा कॉफी घ्या. त्यात एक चमचा टूथपेस्ट, अर्धा चमचा हळद आणि गुलाबजल घालून मिक्स करा. तयार पेस्ट काखेत लावा. १० मिनिटांसाठी लावून हाताने रगडा. नंतर पाण्याने पेस्ट धुवून काढा. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून एकदा करू शकता. यामुळे नक्कीच काखेतला काळेपणा दूर होईल.

एलोवेरा जेल

एलोवेरा जेलमुळे स्किनला नवी चमक मिळते. अँटिऑक्सिडंट-समृद्ध कोरफड एंझाइम्स लॉक करते ज्यामुळे काळपट पडलेली मान आणि अंडरआर्म्स क्लिन होतात. मानेचा काळेपणा घालवण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये कॉफी पावडर मिक्स करा. तयार जेल १५ मिनिटांसाठी मानेवर लावून ठेवा. नंतर पाण्याने धुवा. यामुळे मान आणि काखेतला काळेपणा निघून जाईल.

बाराही महिने टाचांना भेगा पडतात? ३ सोपे घरगुती उपाय; भेगा होतील गायब-टाचा मऊमुलायम

खोबरेल तेल

खोबरेल तेल फक्त केसांसाठी नसून, काखेतला काळेपणा घालवण्यासाठीही मदत करेल. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा खोबरेल तेल घ्या. त्यात टूथपेस्ट आणि अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करा. नंतर अर्धा लिंबू मिश्रणात बुडवून मान आणि अंडरआर्म्सवर रगडा. १० मिनिटानंतर पाण्याने अंडरआर्म्स धुवून काढा. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून एकदा करू शकता. यामुळे नक्कीच फरक दिसेल.

Web Title: How to Lighten Underarms: Natural Remedies and know how to use this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.