Lokmat Sakhi >Beauty > काळपट अंडर आर्म्सचा वैताग आलाय? ४ घरगुती उपाय, काळेपणा - दुर्गंधीला करा बाय - बाय...

काळपट अंडर आर्म्सचा वैताग आलाय? ४ घरगुती उपाय, काळेपणा - दुर्गंधीला करा बाय - बाय...

Black Under Arms Home remedy काळ्या अंडरआर्म्सच्या समस्येमुळे त्रस्त असाल, तर काही घरगुती उपायांनी या समस्येवर मात करता येईल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 07:37 PM2022-11-25T19:37:09+5:302022-11-25T19:40:13+5:30

Black Under Arms Home remedy काळ्या अंडरआर्म्सच्या समस्येमुळे त्रस्त असाल, तर काही घरगुती उपायांनी या समस्येवर मात करता येईल..

How to Lighten Your Underarms, follow 4 home remedies to lighten underarms | काळपट अंडर आर्म्सचा वैताग आलाय? ४ घरगुती उपाय, काळेपणा - दुर्गंधीला करा बाय - बाय...

काळपट अंडर आर्म्सचा वैताग आलाय? ४ घरगुती उपाय, काळेपणा - दुर्गंधीला करा बाय - बाय...

काळवंडलेल्या अंडर आर्म्समुळे अनेक महिला त्रस्त असतात. अशा अंडर आर्म्समुळे अनेकांना लहान बाह्यांचे कपडे परिधान करायला गैरसोयीचे वाटते. तुम्हाला देखील असा त्रास असेल तर, घरगुती साहित्यांचा वापर करून काळवंडलेल्या अंडर आर्म्सच्या त्वचेला उजाळा देऊ शकता. मात्र, काखेतील त्वचा ही संवेदनशील असते, त्यामुळे घरगुती उपाय करतानाही त्वचेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. या समस्येमुळे केवळ महिलाच नाही तर पुरुष देखील त्रस्त असतात. जाणून घेऊया यावरील घरगुती उपाय.

मध

काळ्या अंडरआर्म्सची समस्या दूर करण्यासाठी मध खूप उपयुक्त आहे. काखेच्या भागात मध लावा. हे मध सगळीकडे चांगले पसरवा. त्यानंतर हे मध किमान १० मिनिटे तरी तसेच ठेऊन द्या. त्यानंतर पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने काखेतील काळपटपणा दूर होईल. उत्तम रिझल्टसाठी ही प्रक्रिया महिन्यातून ४ ते ५ वेळा करा.

लिंबाचा रस

लिंबाचा रस अनेक कारणांसाठी उपयुक्त आहे. लिंबाच्या रसाने काखेतील काळपटपणा दूर होईल. आपण काळपट पडलेल्या जागेवर थेट लिंबाचा रस लावू शकता. असे केल्याने हाताखालील काळेपणा दूर होईल. 

कोरफड जेल

एलोवेरा जेल अंडरआर्म्सच्या काळपटपणा दूर करेल. एलोवेरा जेल काळवंडलेल्या आर्म्सवर लावा.१० ते १५ मिनिटे हलक्या हातांनी मसाज करा. त्यानंतर सामान्य पाण्याने धुवा. असे केल्याने स्किन सॉफ्ट होईल यासह काळपटपणा निघून जाईल.

बेसन

बेसनाच्या वापराने अंडरआर्म्सची समस्या दूर होऊ शकते. बेसनामध्ये लिंबाचा रस मिसळून प्रभावित भागावर लावा. हे मिश्रण १० ते १५ मिनिटे ठेऊन द्या. जेव्हा मिश्रण सुकेल तेव्हा पाण्याने धुवा. असे केल्याने काळपटपणापासून आराम मिळेल. यासह काखेतील दुर्गंधी देखील कमी होईल.

Web Title: How to Lighten Your Underarms, follow 4 home remedies to lighten underarms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.