आजच्या काळात कोणाला सुंदर दिसावं असं वाटत नाही. प्रत्येकाला आपली स्किन ग्लो करावी असं वाटतं. यासाठी अनेक महिला पार्लरमध्ये जातात किंवा महागडे प्रॉडक्ट्सचा वापर करतात. पण काही वेळेला प्रॉडक्ट्समध्ये केमिकल रसायने आढळतात, अशा स्थितीत चेहरा खराब होतो. त्यामुळे असे प्रॉडक्ट्स वापरावं की टाळावं असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण होते.
पण आपण मेकअपविना चेहऱ्याला ग्लो लूक देऊ शकता. सेलिब्रिटींसारखी चेहऱ्यावर चमक हवी असल्यास या काही टिप्स फॉलो करा. यासाठी मेकअपची गरज नाही. फक्त योग्य आहार, त्वचेची निगा इत्यादींच्या मदतीनेच आपण चमकदार त्वचा मिळवू शकता(How To Look Beautiful Without Makeup - 5 Natural Tips).
मेकअपविना मिळवा चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो
आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा
खराब जीवनशैलीचा थेट परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे तुमच्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करणे गरजेचं आहे. यासाठी आहारात प्रथिने, अँटिऑक्सिडंट, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे शरीर आतून त्वचेला पौष्टीक घटक देईल. यासह नियमित व्यायाम करा.
पूजेच्या कापुराचे ३ फायदे, डेड स्किन ते पिग्मेंटेशन यावर फार उपयोगी
भरपूर पाणी प्या
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. म्हणूनच या ऋतूत अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला मिळतो. जास्त पाणी प्यायल्याने त्वचेच्या संबंधित अनेक समस्या दूर होतात. सर्वसाधारणपणे, व्यक्तीने दिवसातून सात ते आठ ग्लास पाणी प्यावे.
चेहऱ्याला हायड्रेट ठेवायचंय, वापरून पाहा टरबूज फेसपॅक, २ मिनिटात चेहरा होईल तुकतुकीत - करेल ग्लो
पुरेशी झोप घ्या
कमी झोप घेतल्यास त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. किमान सात तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. यासह स्क्रीन टायमिंग करा, यामुळे तुमची त्वचा चमकदार व टवटवीत दिसेल.
त्वचेची काळजी घ्या
जर आपण नियमित पार्लरमध्ये जात नसाल तर, त्वचेची क्लीनिंग, मॉइश्चरायझिंग, स्क्रबिंग, टोनिंग करत राहा. घराबाहेर पडताना सनस्क्रीन जरूर लावा.
५ चुकांमुळे कायमची थांबते केसांची वाढ, केस गळतात-विरळ होतात
तणावाला बाय बाय म्हणा
तणावामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. ज्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. हे डार्क सर्कल सहसा लवकर निघत नाही. अशा स्थितीत स्ट्रेस - फ्री राहण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे आरोग्याला नक्कीच फायदा होईल.