Join us  

मेकअप न करताही सुंदर दिसता येतं.. त्यासाठी करा फक्त 5 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 5:19 PM

चेहेऱ्यावरचे दोष मेकअपच्या आड लपवण्यापेक्षा ( looks beautiful without makeup) चेहेरा नेसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी (naturally beautiful) प्रयत्न करायला हवा. त्वचा नैसर्गिक रित्या सुंदर करण्याचे उपाय आहेत आणि ते सहज अंमलात आणता येणारे असून त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहातात.

ठळक मुद्देत्वचा स्वच्छ असल्यास चेहेरा सुंदरच दिसतो.चेहेऱ्यावर मृत त्वचा साठून राहिल्यास चेहरा निस्तेज दिसतो. सुंदर दिसण्यासाठी दात आणि केसांच्या आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी. 

सुंदर दिसायचं (for looking beautiful)  तर मेकअपच करायला हवा असा काही नियम नाही. मेकअप करण्यासाठी तासनतास आरशासमोर घालवले जातात. महागाचे सौंदर्य उत्पादनं वापरले जातात. मेकअपमुळे चेहेऱ्यावरचे दोष तात्पुरते झाकले जातात. चेहेऱ्यावर सतत मेकअप ठेवता येतच नाही. चेहेऱ्यावरचे दोष मेकअपच्या आड लपवण्यापेक्षा ( beauty without makeup)  चेहेरा नेसर्गिकरित्या  (for looking naturally beautiful) सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्वचा नैसर्गिक रित्या सुंदर करण्याचे उपाय आहेत (tips for enhance natural beauty) आणि ते सहज अंमलात आणता येणारे असून त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहातात.

Image: Google

मेकअपशिवाय सुंदर दिसायचं असेल तर..

1. मेकअपशिवाय सुंदर दिसण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे त्वचा स्वच्छ ठेवणं. त्वचा स्वच्छ असल्यास चेहेरा सुंदरच दिसतो. सौम्य किंवा नैसर्गिक क्लीन्जर आणि फेसवाॅशचा वापर करुन त्वचा स्वच्छ ठेवावी. बाहेर जाताना चेहेरा धुणं जेवढा गरजेचा तितकाच बाहेरुन आल्यानंतरही चेहेरा स्वच्छ धुणं आवश्यक आहे. त्वचा स्वच्छ असल्यास चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येत नाही. 

2. चेहेरा नैसर्गिकरित्या सुंदर करण्यासाठी त्वचेच्या देखभालीसाठीचं तंत्र सांभाळावं. यासाठी चेहेरा वरचेवर धुण, चेहेरा धुतल्यानंतर चेहेऱ्याला टोनर लावणं, मग चेहेऱ्याला सीरम किंवा माॅश्चरायझर लावणं आवश्यक आहे. त्वचेच्या योग्य देखभालीत फेसवाॅश, टोनर, माॅश्चरायझर या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्वचेची अशा पध्दतीनं देखभाल सकाळी आणि रात्री झोपताना घेतल्यास त्वचा निरोगी होते, सुंदर दिसते. 

3. चेहेऱ्यावर मृत त्वचा साचून राहिल्यास चेहेऱ्यावरचं तेज हरवतं. निरोगी स्वच्छ त्वचा व्यक्तिमत्वचाच भाग असते. त्यामुळे चेहेऱ्यावरची मृत त्वचा काढून टाकण्यासाठी वेळच्या वेळी चेहेरा एक्सफोलिएट (त्वचेची खोलवर स्वच्छता) करणं आवश्यक असतं. 

Image: Google

4. सुंदर दिसण्यास त्वचेच्या काळजीसोबत केसांची काळजी घेणंही आवश्यक आहे. केसात कोंडा होवू न देणं, केस निरोगी, मऊ मुलायम आणि चमकदार होण्यासाठी हेअर पॅक लावणं, केसांसाठी योग्य शाम्पू आणि कंडिशनर निवडून केसांची स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे. मधून मधून केस कापल्यानं केस निरोगी राहातात आणि केसांची वाढ होवून केस सुंदर दिसतात. 

5. नैसर्गिक सौंदर्यात दातंच्या स्वच्छतेचा मोठ वाटा असतो. दात स्वच्छ ठेवण्यासाठी दर सहा महिन्यांनी डेंटिस्टकडे जाऊन दात स्व्च्छ करणं, दातांची तपासणी करणं आवश्यक. दात स्वच्छ असल्यास चेहेऱ्यावर जे हास्य खुलतं त्यामुळे चेहेऱ्यास सौंदर्य प्राप्त होतं..

निरोगी त्वचेसाठी..

1. नैसर्गिक सौंदर्यासाठी निरोगी त्वचा असणं ही प्राथमिक अट आहे. त्वचा निरोगी राहाण्यासाठी झोप पुरेशी होणं आवश्यक आहे. झोप पूर्ण झाल्यास त्वचा ताजी तवानी दिसते. झोप पूर्ण झाल्यास चेहेऱ्यावर सूज दिसत नाही. झोप चांगली झालेली असल्यास कोलॅजनची निर्मिती वाढते आणि त्वचेचं एजिंगपासून रक्षण होतं. 

2. त्वचा निरोगी राहाण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. यामुळे शरीर आणि त्वचा ओलसर राहाते.

3. पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यासोबतच पौष्टिक आणि संतुलित आहार नियमित घेतल्यास निरोगी त्वचा प्राप्त होते. रोजचा आहार जीवनसत्वं आणि खनिजंयुक्त असावा. आहरात ओमेगा 3 आणि ई जीवनसत्वांचा समावेश अवश्य करावा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी