Lokmat Sakhi >Beauty > स्मार्ट, आकर्षक दिसण्यासाठी पैसेच लागतात असं नाही... 6 सोप्या ट्रिक्स आणि दिसा स्मार्ट- सुंदर

स्मार्ट, आकर्षक दिसण्यासाठी पैसेच लागतात असं नाही... 6 सोप्या ट्रिक्स आणि दिसा स्मार्ट- सुंदर

Tricks and Tips To Look Smart: स्मार्ट- सुंदर- आकर्षक दिसण्यासाठी नेहमी खूप पैसेच मोजावे लागतात, असं काही नाही.. या साध्या- सोप्या गोष्टी करून बघा. नक्कीच आहे त्यापेक्षा अधिक स्मार्ट दिसाल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 03:05 PM2022-07-29T15:05:33+5:302022-08-04T16:43:56+5:30

Tricks and Tips To Look Smart: स्मार्ट- सुंदर- आकर्षक दिसण्यासाठी नेहमी खूप पैसेच मोजावे लागतात, असं काही नाही.. या साध्या- सोप्या गोष्टी करून बघा. नक्कीच आहे त्यापेक्षा अधिक स्मार्ट दिसाल.

How to look smart and attractive? Inexpensive ways of looking beautiful and trendy  | स्मार्ट, आकर्षक दिसण्यासाठी पैसेच लागतात असं नाही... 6 सोप्या ट्रिक्स आणि दिसा स्मार्ट- सुंदर

स्मार्ट, आकर्षक दिसण्यासाठी पैसेच लागतात असं नाही... 6 सोप्या ट्रिक्स आणि दिसा स्मार्ट- सुंदर

Highlightsतुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या किंवा अगदी कमी बजेटमध्ये मिळणाऱ्या गोष्टी वापरूनही तुम्ही स्वत:चा मेकओव्हर करू शकता. त्यासाठी या काही गोष्टींवर अधिक लक्ष दिलं पाहिजे.

वय कितीही वाढलं तरी स्मार्ट, सुंदर, आकर्षक दिसावं अशी प्रत्येक स्त्री ची इच्छा असते. मग ती स्त्री कोणत्याही वयोगटातली असू दे. पण या बाबतीत अनेक जणी नेहमीच एक घोळ करतात. स्मार्ट सुंदर दिसायचं (Inexpensive ways of looking beautiful and trendy) असेल तर मग तुम्ही स्वत:वर खूप पैसे खर्च केले पाहिजेत, तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या गोष्टी महागड्याच असल्या पाहिजेत, असा एक समज बऱ्याच जणींचा असतो. पण खरंतर बऱ्याच अंशी तो चुकीचा आहे. तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या किंवा अगदी कमी बजेटमध्ये (Tricks and Tips To Look Smart) मिळणाऱ्या गोष्टी वापरूनही तुम्ही स्वत:चा मेकओव्हर (how to do makeover with minimum budget) करू शकता. त्यासाठी या काही गोष्टींवर अधिक लक्ष दिलं पाहिजे.

 

खरेदी (shopping)
खरेदी करणं हा अनेक महिलांचा आवडीचा विषय. आणि तिथेच तर सगळ्यात जास्त पैसे खर्च होतात. म्हणूनच जेव्हा स्वत:साठी कपड्यांची, दागिन्यांची, चपला- बुटांची खरेदी कराल, तेव्हा ती थोडीशी वेळ घेऊन आणि काळजीपुर्वक करा. बऱ्याचदा एखाद्या वस्तूचा मोह होतो आणि त्या मोहापायी आपण ती वस्तू घरी घेऊन येतो. पण घरी आणल्यानंतर ती वस्तू आपल्या उपयोगाचीच नाहीये किंवा तिथे वाटली तेवढी छान ती दिसतच नाहीये, असं होतं आणि मग ती वस्तू घरात तशीच पडून राहते. त्यामुळे जेव्हा स्वत:साठी काही घ्याल तेव्हा ते व्यवस्थित ट्राय करून बघा आणि मगच घ्या. कमी पैशातल्याच वस्तू निवडा, पण त्या निवडताना त्यांच्यामध्ये एक क्लासी लूक असेल, याची मात्र काळजी घ्या. 

 

कपडे आणि ॲक्सेसरीज घालताना..
जेव्हा तुम्ही बाहेर जाण्यासाठी तयार होता तेव्हा अधिक ग्रेसफूल, चार्मिंग दिसण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे, याची माहिती इन्स्टाग्रामच्या stylemuze या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये सांगण्यात आलेल्या काही खास टिप्स..
१. घराबाहेर पडताना कपड्यांची निवड चोखंदळपणे करा. तुमच्या अंगावरचे कपडे हे व्यवस्थित इस्त्री केलेलेच असावेत.
२. साधा रबरबॅण्ड लावून बो घातल्यावर किंवा सगळे केस घेऊन क्लचरमध्ये ते घट्ट बांधून टाकले तर तुम्ही आहे त्यापेक्षा अधिक वयाच्या दिसता. त्यामुळे केस बांधताना ते शक्यतो पुर्ण बांधू नका. अर्धे केस बांधून अर्धे मोकळे ठेवले तरी चालेल.


३. आवडत असेल तर एक छानसा हेअरकट करून केस मोकळे सोडा. शोल्डर लेव्हलपर्यंत असलेले मोकळे केस तुम्हाला अधिक यंग लूक देताता. तेल लावलेले चिपचिपित केस ठेवून कधीही बाहेर जाऊ नका.
४. बाहेर पडताना चेहऱ्यावर हलकासा मेकअप केलेला असावा आणि अंगावर एक मंद परफ्यूमचा सुगंध असावा.
५. हाय हिल्समध्ये कम्फर्टेबल असाल, तर नक्कीच त्याला पहिलं प्राधान्य द्या. कारण त्यात तुमचा डौल निश्चितच वेगळा दिसतो.
६. स्मार्ट लूक येण्यासाठी कमीतकमी पण देखण्या ॲक्सेसरीज घाला. कमी किमतीच्या असल्या तरी त्यात एक क्लासी लूक असावा. 


 

Web Title: How to look smart and attractive? Inexpensive ways of looking beautiful and trendy 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.