आपण कधीही म्हातारं होऊ नये कायम तरूण दिसावं असं प्रत्येकालाचच वाटतं. नेहमी तरूण, सुंदर दिसण्यासाठी इच्छा प्रत्येकाचीच असते. (Young looking tips ayurvedic remedies to look young)अनेक अभिनेते, अभिनेत्री वयाची पन्नाशी उलटल्यानंतरही पंचविशीत असल्यासारखे दिसतात. यामागे त्यांची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या सवयी व्यायाम यांची महत्वाची भूमिका असते. पाणी शरीराच्या चांगल्या कार्यासाठी महत्वाचे आहे. (How to look younger after 40)
सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्या
फिटनेस एक्स्पर्ट्सच्यामते रोज सकाळी कोमट पाणी प्या. सकाळी १ ते २ ग्लास गरम पाणी प्यायल्यानं आतडे स्वच्छ राहतात. पोट साफ होण्यास मदत होते याशिवाय आजारांचा धोका टळतो. त्वचा चमकदार राहते.
थंड पाणी पिणं टाळा
उन्हाळा असो किंवा हिवाळा थंड पाणी पिऊ नका. थंड पाणी सतत प्यायल्यानं पोटाच्या आतली सिस्टीम थंड पडते यामुळे ब्रेन आणि हार्टच्या नसांवरही परिणाम होतो. अशा स्थितीत हार्ट अटॅक किंवा ब्रेन अटॅक येण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यात अंगावर पांढरं पाणी जाण्याचा त्रास वाढला? खाज येते? -ही इन्फेक्शनची लक्षणं तर नाहीत..
जेवल्यानंतर पाणी पिऊ नका
आयुर्वेदीक एक्सपर्ट्सच्यामते जेवल्यानंतर लगेचच थंड पाणी पिऊ नका. जेवल्यानंतर अन्न पचवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. जर तुम्ही लगेचच गरम पाणी प्यायलात तर जठराग्ननी थंड पडतो. यामुळे अन्न पचण्याची क्रिया थंड होते जेवल्यानंतर अर्ध्या तासानं पाणी पिणं उत्तम ठरते तेही तुम्ही कोमट किंवा सामान्य तापमानातील पाणी प्यायला हवं.
कोण म्हणतं व्हेज अन्नात प्रोटीन नसतं? भरभरून प्रोटीन्स देतात ५ आयुर्वेदीक पदार्थ, आजपासूनच खा
कायम तरूण दिसण्यासाठी टिप्स
१) तुमच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने नव्हे तर पाण्याने करा. याचे कारण असे की पाण्यामुळे त्वचेच्या ऊतींची भरपाई होण्यास मदत होते.
२) रोज बदाम आणि अक्रोड खा. यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ई त्वचेचे पोषण आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करते.
३) प्रथिनेयुक्त अन्न खा कारण ते खराब झालेल्या ऊतींना बरे करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते.
४) आठवड्यातून 5 दिवस 20 मिनिटांसाठी वेट ट्रेनिंग करा कारण यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे शरीराला अधिक पोषक द्रव्ये पोहोचण्यास मदत होते.