चेहऱ्यावर छान ग्लो यावा, डेड स्किन निघून जाऊन छान कोमल, नितळ व्हावी म्हणून बहुतांशजणी नेहमीच फेशियल करतात. आता तर सध्या लग्नसराई आणि संक्रांतीच्या हळदी- कुंकू कार्यक्रमांची धूम आहे. त्यामुळे अनेकजणी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करून येतात. फेशियल केल्यानंतर चेहऱ्यावर छान ग्लो देखील येतो. पण हा ग्लो ४ ते ५ दिवसांतच कमी होऊ लागतो (How to maintain glow on skin after facial). असं होऊ नये आणि चेहऱ्यावरचा ग्लो पुढचे काही दिवस असाच कायम राहावा, यासाठी काय करायचं ते आता पाहूया...(What to do after facial for long lasting glow on skin?)
फेशियल केल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी?
१. फेशियल केल्यानंतर त्याच दिवशी चेहऱ्यावर इतर काहीही उपाय करू नयेत. त्यादिवशी आपल्या त्वचेला पुर्णपणे आराम द्यावा. तसेच फेशियल केल्यानंतर उन्हात जास्त वेळ थांबणे टाळावे. जर उन्हात बाहेर पडावंच लागणार असेल तर चेहऱ्याला पुर्णपणे स्कार्फ गुंडाळून घ्यावा.
भारताची मँगो लस्सी जगात भारी, बघा TasteAtlas च्या टॉप १० यादीत असणारे ३ भारतीय पेय
२. फेशियल केल्यानंतर चेहऱ्याला व्हिटॅमिन सी सिरम लावायला विसरू नका. यामुळे त्वचेवरचा ग्लो कायम राहील. तुमच्या स्किनटाईपनुसार सिरमची निवड करा.
३. फेशियल केल्यानंतर त्वचेची आग होत असेल, खाज येत असेल किंवा चेहरा सुजल्यासारखा वाटत असेल तर चेहऱ्यावर बर्फ लावून चेहऱ्याची मसाज करा. यासाठी बर्फ एका सुती कापडमध्ये गुंडाळा आणि मग त्वचेवरून हळूवार फिरवा. साधारण ४ ते ५ मिनिटे मसाज करा.
४. चेहऱ्याला गुलाब पाणी लावल्यानेही फेशियल केल्यानंतर येणारा ग्लो मेंटेन ठेवण्यास मदत होते.
हिवाळ्यात खाऊन पाहाच मेथीची, करडईची खमंग पचडी, बघा ५ मिनिटांत होणारी चवदार रेसिपी
यासाठी फेशियल केल्यानंतर काही दिवस रात्री झोपण्यापुर्वी आणि सकाळी उठल्यानंतर चेहऱ्याला गुलाबपाणी लावावे. या काही गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच फेशियलनंतर आलेला ग्लो अधिककाळ टिकून राहील.