केस गळण्याची समस्या आजकाल प्रत्येक वयोगटातील व्यक्तींमध्ये उद्भवते. (Hair Care Tips) स्ट्रेटनिंग, हायलाईट, ग्लोबल कलर यांसारख्या हेअर फॅशन स्टाईल्समुळे केसांवर हिटींग टुल्स आणि केमिकल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे केस गळायला लागतात. (Home Remedies For Hair Growth)
एकदा केस गळायला सुरूवात झाली की महागड्या ट्रिटमेंट करूनही हवातसा बदल दिसत नाही. केस गळण्यावर उपाय म्हणून तुम्ही घरगुती पदार्थ वापरून पाहू शकता. याचे कोणतेही साईड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाहीत. (Get long thick hairs using 2 rupees coffee)
हा उपाय हा करण्यासाठी सगळ्यात आधी एक ताज्या एलोवेराचे साल काढून मिक्सरमध्ये फिरवून पातळ पेस्ट तयार करा. हे पेस्ट एका बाऊलमध्ये काढून त्यात कॉफी पावडर, नारळाचं तेल घाला. तयार मिश्रण एकत्र करून केसांच्यां मुळांना व्यवस्थित लावा. 1 तास केस तसेच ठेवून स्वच्छ शॅम्पूनं केस व्यवस्थित धुवा.
अकाली केस पांढरे होण्यापासून सुटका मिळवण्यासाठी कॉफीचा वापर केला जाऊ शकतो. हे नैसर्गिकरित्या तुमचे केस काळे आणि काळे करते. नैसर्गिक केसांच्या रंगांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जेव्हा पोषणाची कमतरता असते तेव्हा केस गळायला लागतात, अशा परिस्थितीत कॉफी वापरल्याने त्यांना आवश्यक पोषण मिळते.
पिरिएड्समध्ये स्तन खूप जड वाटतात? ३ प्रकारच्या ब्रा वापरा, स्तन राहतील सुरक्षित, दिसतील मेंटेन
कॉफीमध्ये फ्लेव्होनॉइड्स चांगल्या प्रमाणात आढळतात, जो एक प्रकारचा अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहे. बदलत्या ऋतूमध्ये केसांमध्ये आर्द्रता कमी झाल्यामुळे केस कोरडे होण्याची समस्या सुरू होते. यामुळे केसांमधील आर्द्रता टिकून राहते. त्यामुळे केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी कॉफीचा वापर फायदेशीर ठरू शकतो.