हिवाळा आता चांगलाच जाणवायला लागला आहे. सकाळी आणि रात्रीच्यावेळी तर वातावरण चांगलेच थंडगार होऊन जाते. हिवाळ्यातल्या थंडीचा सगळ्यात पहिला परिणाम दिसून येतो तो आपल्या त्वचेवर. या दिवसांत त्वचा लगेच कोरडी पडते. बरेच जण तर हिवाळ्यात अंगाला साबण लावणेही टाळतात. कारण यामुळे त्वचेचा कोरडेपणा जास्तच वाढतो. पण बऱ्याच महिलांना धुणी- भांडी करण्यासाठी साबणात हात घातल्याशिवाय पर्याय नसतो. साबणाचा वारंवार संपर्क आल्यामुळे मग हात कोरडे पडतात. तळहातांची सालंही निघतात. असं तुमच्याही बाबतीत हाेत असेल तर हे काही उपाय करून पाहा (Home Remedies For Dry Palms). हातांचा कोरडेपणा कमी होण्यास निश्चितच मदत हाेईल.(how to maintain softness of hands in winter?)
साबणात काम केल्यामुळे तळहात कोरडे पडत असल्यास उपाय
१. सॉफ्ट साबण वापरा
तुम्ही वापरता ती साबण किंवा डिटर्जंट किती हार्ड आहे किंवा किती स्ट्राँग आहे हे एकदा तपासून पाहा. भांडी घासण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी नेहमी सॉफ्ट साबण किंवा डिटर्जंट वापरावे.
कमालच झाली! चक्क ४ अभिनेत्रींनी खरेदी केला एकसारखा ड्रेस- बघा कोण त्या चौघी, कसा आहे तो ड्रेस?
पावडर डिटर्जंटऐवजी लिक्विड डिटर्जंट आणि साबणाऐवजी लिक्विड डिशवॉश वापरण्यास प्राधान्य द्या. यामुळेही तळहातांचा कोरडेपणा बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
२. खोबरेल तेलाने मसाज
धुणं, भांडी अशी कामं झाल्यानंतर लगेचच हात पुसून कोरडे करून घ्या आणि ३ ते ४ थेंब खोबरेल तेल किंवा साजूक तूप हातावर घेऊन हातांना मसाज करा.
Winter Fashion: करिना कपूरचा हा ड्रेस आवडला असेल तर तुम्हीही घेऊ शकता, किंमत अगदीच कमी...
दिवसातून जेवढ्या वेळा तुम्हाला साबणात हात घालून काम करावे लागेल तेवढ्या वेळा हा उपाय करा. यामुळे तुमचे तळहात मुळीच कोरडे पडणार नाही.
३. बदाम तेल
त्वचेला कोमल ठेवण्यासाठी बदाम तेल अतिशय उपयुक्त ठरते. दररोज रात्री झोपण्यापुर्वी बदाम तेलामध्ये १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाका.
हिवाळ्यात न चुकता करावा 'हा' व्यायाम; वजन भराभर कमी होईल- हृदय राहील मजबूत
दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि त्याने तळहातांना मसाज करा. संपूर्ण हाताला, पायाला आणि चेहऱ्याला हे मिश्रण लावले तरी चालेल.