Join us

उन्हाळ्यात थंडाव्यासाठी मेहेंदी ऐवजी केसांना लावा ‘हा’ सिक्रेट हेअर मास्क, भाजून काढणाऱ्या उन्हातही केस सिल्की सिल्की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 08:42 IST

How to make a hair mask with hibiscus : Hibiscus For Hair Growth : Home Made Hair Masks : Homemade hair mask for soft and shiny hair : उन्हाळ्यात केसांच्या अनेक समस्या सतावतात, यासाठी हा घरगुती हेअर मास्क वापरुन पाहा...

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यावर केसांची तऱ्हा अशी होते की त्यांच्याकडे बघवत देखील नाही. अनेकदा आपण उन्हांत फिरताना उष्णता आणि वाढत्या गरमीचा थेट परिणाम आपल्या (How to make a hair mask with hibiscus) केसांवर होताना दिसतो. उन्हाळ्यांत केसांची विशेष काळजी घ्यावी लागतेच. यासाठी उन्हाळ्यात केसांवर तेल लावले असता केस घामाने चिकट - तेलकट होतात. इतकेच नव्हे (Home Made Hair Masks) तर केसांना तेल न लावता केस (Homemade hair mask for soft and shiny hair) असेच धुतले तर ते कोरडे, रुक्ष, निस्तेज होतात. अशा परिस्थितीत, केसांची काळजी नेमकी घ्यावी कशी, असा प्रश्न आपल्याला पडतो. उन्हाळ्यात केसांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेण्यासाठी आपण अनेक उपाय करतो.

या घरगुती उपायांमध्ये आपण केसांवर एक घरगुती हेअर मास्क देखील लावू शकतो. केसांवर हा हेअर मास्क लावल्याने भर उन्हाळ्यात आपली स्काल्प आणि केसांना थंडावा मिळण्यास मदत होते. थंडाव्यासोबतच, उन्हाळामुळे चिकट - तेलकट झालेले स्काल्प आणि केसांच्या स्वच्छतेसाठी हा हेअर मास्क लावणे फायदेशीर ठरते. यंदाच्या उन्हाळ्यात केस आणि स्काल्पची स्वच्छता आणि थंडाव्यासाठी मेहेंदी ऐवजी हा घरगुती हेअर मास्क नक्की ट्राय करुन पाहा. मेहेंदी ऐवजी जास्वंदीची पानं, फुलं, कोरफड, दही वापरुन केसांसाठी हेअर मास्क कसा तयार करायचा याबद्दल अधिक माहिती masalakitchenbypoonam या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे.         

साहित्य :-

१. जास्वंदीची  फुलं - ५ ते ६ फुलं २. जास्वंदीची पानं - मूठभर पानं ३. एलोवेरा - १ कप ४. दही - १ कप 

थ्रेडिंग-वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेला लावा ‘हा’ स्क्रब, दुखणार नाही-जळजळ आणि खाजही होईल कमी...

कृती :- 

सगळ्यत आधी जास्वंदीची फुलं, पानं, कोरफडच्या काड्या स्वच्छ धुवून घ्या. आता मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात जास्वंदीची फुलं, पानं, एलोवेरा जेल आणि दही घालावे. आता मिक्सरमध्ये हे सगळे मिश्रण एकत्रित वाटून घ्यावे. हे सगळे मिश्रण एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. तयार पेस्ट एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावी. 

याचा वापर कसा करावा ?

ही तयार पेस्ट एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावी. त्यानंतर ब्रश किंवा हातांच्या मदतीने केसांच्या मुळांपासून ते खालच्या टोकापर्यंत ही पेस्ट संपूर्णपणे केस आणि स्काल्पवर लावून घ्यावी. ही पेस्ट केसांवर अर्धा ते एक तास अशीच लावून ठेवावी, त्यानंतर केस पाण्याचे स्वच्छ धुवून घ्यावेत. आठवड्यातून किमान एकदा जरी हा उपाय केला तरी केस आणि स्काल्पला नैसर्गिक थंडावा मिळण्यास मदत होते.

आलिया भटही उन्हानं बेजार! केस आणि त्वचेसाठी करतेय ‘हे’ खास उपाय, आलियानेच सांगितलं सिक्रेट...

उन्हाळ्यात अंगाला साबण नका लावू, ‘ही’ पावडर लावा-घामाची दुर्गंधी जाईल,डिओ-परफ्युमची गरजच नाही...

हा हेअर मास्क लावण्याचे फायदे... 

या हेअर मास्कमध्ये, जास्वंदीची पानं, फुलं घातली असल्याने, या दोन्ही गोष्टी आपल्या केसांचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात. केसांच्या मुळांना यामुळे मजबुती मिळते. याचबरोबर, केस गळती रोखण्यास आणि त्यांना लांब आणि दाट करण्यास मदत होते. दह्यामुळे केस आणि स्काल्पला नैसर्गिक थंडावा मिळतो. डोक्यातील कोंडा आणि केसांसंबंधित इतर समस्या देखील कमी होण्यास मदत होते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीसमर स्पेशलहोम रेमेडी