उन्हाळयात आपल्याला भरपूर घाम येतो. या घामामुळे अंगाला येणारी दुर्गंधी अगदी नकोशी वाटते. उन्हाळ्यात आपण आधीच संपूर्णपणे अंगाला आलेल्या घामाने डबडबलेले असतो, त्यातच ती घामाची येणारी (How to make your perfume last ALL DAY Long During Summer Season) दुर्गंधी. या सतत अंगाला आलेल्या घामातून (ips on how to apply perfume so it will last longer) येणाऱ्या दुर्गंधीमुळे आपल्याला काहीवेळा चारचौघात लाजिरवाणे वाटते. यासाठीच आपण उन्हाळयात घामाचा दुर्गंध येऊ नये म्हणून फार मोठ्या प्रमाणावर परफ्युम, डिओ किंवा सुगंधित (tips and tricks to make your perfume last longer) स्प्रेचा वापर करतो. परंतु अनेकदा आपल्याला हा अनुभव आलाच असेल की, कितीही महागडा आणि अधिक जास्त प्रमाणात परफ्युम लावला तरीही त्याचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहत नाही(How to Make a Perfume Last Longer).
यासाठी आपण दीर्घकाळ टिकून राहणारे लॉन्ग लास्टिंग स्प्रे, परफ्युम वापरतो, परंतु हे परफ्युम देखील लॉन्ग लास्टिंग असून देखील लावताच ५ मिनिटांत उडून जातात. यासाठीच, आपण अंगावर किंवा कपड्यांवर लावलेला डिओ, परफ्युम, स्प्रे दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवूयात. जर तुम्हाला देखील भर उन्हाळ्यात डिओ, परफ्युम, स्प्रे दीर्घकाळ टिकवून ठेवायचा असेल तर खाली दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा.
उन्हाळ्यात डिओ, परफ्युम, स्प्रे दीर्घकाळ टिकवून ठेवायचा असेल तर...
१. केसांत घामाची दुर्गंधी येऊ नये यासाठी देखील हेअर परफ्यूम्स वापरले जातात. परंतु असे महागडे परफ्यूम्स विकत न घेता आपण नेहमीचा जो परफ्युम वापरतो तोच फणीवर स्प्रे करून घ्यावा. त्यानंतर त्या फणीने केस विंचरा यामुळे तुमच्या केसांना खूप छान सुगंध येईल आणि घामाचा दुर्गंध अजिबात येणार नाही.
उन्हाळयात कलिंगड खा आणि त्वचेलाही लावा! मिसळा फक्त 'हे' ६ पदार्थ - करा त्वचेचे लाड!
२. आंघोळ झाल्यावर तुम्ही लावत असलेल्या बॉडी लोशनमध्ये तुमच्या आवडीचा परफ्युम स्प्रे करून घ्यावा. असे बॉडी लोशन संपूर्ण शरीराला लावून घ्यावे. यामुळे परफ्युमचा सुगंध दीर्घकाळ तुमच्या अंगावर टिकून राहतो. परिणामी, आपल्या अंगाला घामाचा दुर्गंध येत नाही.
३. परफ्युमचा फवारा संपूर्ण अंगभर उडवण्यापेक्षा आपण आपल्या शरीरावरील परफ्युम पॉइंट्सवरच परफ्युम लावावा. आपल्या शरीरावरील एका विशिष्ट जागेवर जसे की, मानेजवळील कॉलर बोन्स, कानाच्या मागे, मनगटावर, हाताचे कोपरे, गुडघ्यात परफ्युम लावल्याने तो दीर्घकाळ टिकण्यास मदत होंते. आपण शक्यतो परफ्युम काखेत स्प्रे करतो जे चुकीचे आहे. परफ्युम दीर्घकाळ टिकण्यासाठी तो नेहमी आपल्या शरीरावरील परफ्युम पॉइंट्सवरच लावावा.
चेहऱ्यावरचे केस काढणारा १ भन्नाट फेसमास्क, केसांसह टॅनिंगही झटक्यात होईल कमी-बाकी झंझट विसरा!
४. मानेजवळील कॉलर बोन्स, कानाच्या मागे, मनगटावर, हाताचे कोपरे, गुडघ्यात अशा परफ्युम पॉइंट्सवर सगळ्यात आधी थोडी पेट्रोलियम जेली लावून घ्यावी. त्यानंतर, त्या पेट्रोलियम जेली लावलेल्या भागावरच परफ्युम स्प्रे केल्याने त्याचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो.
५. शक्यतो एकाच ब्रॅण्डचा बॉडी वॉश, बॉडी लोशन आणि परफ्युम वापरल्याने देखील त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो. यामुळे कोणत्याही प्रकारच्या परफ्युम, स्प्रे किंवा डिओचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.