Lokmat Sakhi >Beauty > केस प्रचंड गळतात? पांढरेही झालेत? शाम्पूनंतर लावा फक्त चहापत्तीचे पाणी, मग बघा कमाल

केस प्रचंड गळतात? पांढरेही झालेत? शाम्पूनंतर लावा फक्त चहापत्तीचे पाणी, मग बघा कमाल

How to Make a Tea Hair Rinse and the Benefits : काय सांगता! केसांसाठी चहापत्तीचे पाणी सर्वोत्तम, पाहा वापरण्याची पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2023 11:59 AM2023-10-02T11:59:45+5:302023-10-02T12:00:43+5:30

How to Make a Tea Hair Rinse and the Benefits : काय सांगता! केसांसाठी चहापत्तीचे पाणी सर्वोत्तम, पाहा वापरण्याची पद्धत

How to Make a Tea Hair Rinse and the Benefits | केस प्रचंड गळतात? पांढरेही झालेत? शाम्पूनंतर लावा फक्त चहापत्तीचे पाणी, मग बघा कमाल

केस प्रचंड गळतात? पांढरेही झालेत? शाम्पूनंतर लावा फक्त चहापत्तीचे पाणी, मग बघा कमाल

खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झाले तर, साहजिक आरोग्याचे तीनतेरा वाजतात. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. यामुळे शरीरात गंभीर आजार तर निर्माण होतातच, शिवाय केस व स्किनवर देखील दुष्परिणाम दिसून येतात. अनकेदा आहार नीट नसला तर, केस पातळ, पांढरे, केसात कोंड्याची समस्या निर्माण होते.

अनेकदा केसांवर आपण केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर करतो. यामुळे केस खराब होतात. केस अकाली पांढरे होणे, किंवा प्रमाणाच्या बाहेर गळत असतील तर, चहापत्तीच्या पाण्याने (Black Tea Water for Hairs) केस धुवा. पण खरंच याने केसांना फायदा होतो का? चहापत्तीच्या पाण्याने केस कसे धुवायचेत? पाहूयात(How to Make a Tea Hair Rinse and the Benefits).

चहापत्तीच्या पाण्याने केस धुण्याचे फायदे

ग्रीन टी आणि ब्लॅक टीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या निरोगी ठेवण्यास मदत होते. आपण चहापत्तीच्या पाण्याने केस धुवू शकता. यामुळे केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळेल. शिवाय, केस गळती, केस पांढरे होण्याची समस्या थांबेल, व स्काल्प देखील क्लिन राहील.

५ सिंपल्स रुल्स, चेहऱ्यावर दिसणारच नाही वाढत्या वयाची खूण-चाळीशीतही दिसाल विशीप्रमाणे फ्रेश आणि तरुण

केसांसाठी चहापत्तीचे पाणी कसे तयार करायचे?

सर्वप्रथम, एका बाऊल घ्या, त्यात २ कप पाणी घाला, नंतर त्यात २ चमचे चहापत्ती घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर ५ मिनिटानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर गॅस बंद करा. शेवटी पाणी गाळून चहापत्ती वेगळी करा.

कांदा-लसणाची सालं फेकू नका, १ सोपा उपाय- अकाली पांढरे झालेले केस होतील काळेभोर

या पद्धतीने वापरा केसांसाठी चहापत्तीचे पाणी

सर्वप्रथम, शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. नंतर चहापत्तीचे पाणी केस व मुळांवर लावा. थोडा वेळ पाणी केसांवर राहूद्या, शेवटी पाण्याने पुन्हा केस धुवा. यामुळे स्काल्प क्लिन होईल, व त्यातील गुणधर्मांमुळे केस पांढरे, केसातील कोंडा, व केस गळतीची समस्या सुटेल.

Web Title: How to Make a Tea Hair Rinse and the Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.