Lokmat Sakhi >Beauty > नारळाच्या शेंड्याचा ‘असा’ करा होममेड डाय-केस चमकतील काळेभोर! विसरा केसांचे शत्रू केमिकलवाले डाय

नारळाच्या शेंड्याचा ‘असा’ करा होममेड डाय-केस चमकतील काळेभोर! विसरा केसांचे शत्रू केमिकलवाले डाय

How to make all natural black hair dye at home : केसांना वरवर काहीही चोपडून ते काळे दिसतील, पण केस कायमचे गमवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 04:09 PM2024-10-22T16:09:20+5:302024-10-22T16:10:16+5:30

How to make all natural black hair dye at home : केसांना वरवर काहीही चोपडून ते काळे दिसतील, पण केस कायमचे गमवाल

How to make all natural black hair dye at home | नारळाच्या शेंड्याचा ‘असा’ करा होममेड डाय-केस चमकतील काळेभोर! विसरा केसांचे शत्रू केमिकलवाले डाय

नारळाच्या शेंड्याचा ‘असा’ करा होममेड डाय-केस चमकतील काळेभोर! विसरा केसांचे शत्रू केमिकलवाले डाय

नारळ म्हणजे कल्पवृक्ष (Coconut). याचा प्रत्येक भाग उपयुक्त ठरतो (Use of Coconuts). पदार्थात वापरण्यासाठी खोबरं, करवंटी आणि शेंड्याचाही वापर बऱ्याच गोष्टींमध्ये होतो (Coconut Shells). पण याचा वापर आपण कधी केसांसाठी करून पाहिलं आहे का? केसांची निगा राखणं अत्यंत गरजेचं आहे (Hair Care Tips). आजकाल कमी वयातच पांढरे केस, केस गळणे, केसात कोंडा यासह इतर समस्यांपासून त्रस्त आहेत. अकाली पांढरे झालेल्या केसांवर उपाय म्हणून आपण, ब्यूटी पार्लरमध्ये धाव घेतो. किंवा सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. पण यात केमिकल रसायनांचा वापर होतो. ज्यामुळे केस आणखीन खराब होण्याची शक्यता असते.

जर कमी वयात केस पांढरे झाले असतील तर, ब्यूटी पार्लरमध्ये धाव घेण्यापेक्षा, हानिकारक रसायनयुक्त डाय लावण्यापेक्षा नारळाच्या शेंड्यांचा वापर करून नैसर्गिक डाय तयार करा. मिनिटात केस काळे होतील(How to make all natural black hair dye at home).

नारळाच्या शेंड्यांचा करा 'असा' वापर; केस काळे होतील झटपट

लागणारं साहित्य


नारळाच्या शेंड्या

तूप

हळद

लवंग

एलोवेरा जेल

व्हिटॅमिन ई कॅप्स्युल

दिवाळीचा फराळ करताना 'या' स्वस्तात मस्त तेलाचा करा वापर; वजन वाढण्याची भीतीच उरणार नाही

खोबरेल तेल

या पद्धतीने करा घरगुती नैसर्गिक डाय

सर्वात आधी एका प्लेटमध्ये नारळाच्या शेंड्या घ्या. त्यात एक चमचा तूप घाला. नंतर आग लावून त्याची राख करा. नारळाच्या शेंड्या जळत असतानाच त्यात एक चमचा हळद, ३--४ लवंग घाला. आग थंड झाल्यानंतर जळालेल्या शेंड्यांची पावडर करा.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

आता चहाची गाळणी घ्या. त्यात पावडर घाला, जेणेकरून पावडर वेगळी होईल. नंतर त्यात अर्धा चमचा एलोवेरा जेल, व्हिटॅमिन ई कॅप्स्युल आणि खोबरेल तेल घालून मिक्स करा. अशा प्रकारे घरगुती आणि नैसर्गिक हेअर डाय वापरण्यासाठी रेडी. आता केस विंचरून घ्या. ब्रशने तयार हेअर डाय केसांना लावा. काही वेळ राहू द्या. ४५ मिनिटांनंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्या. आपण या तयार हेअर डायचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.  

Web Title: How to make all natural black hair dye at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.