Join us  

घरच्याघरी १००% शुद्ध कोरफड जेल बनवायची सोपी कृती, ३ स्टेप्स - महागड्या जेलची गरजच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2023 2:11 PM

1 simple way to make pure organic aloe vera gel at home and preserve for long : घरगुती पद्धतीने केलेले ताजे कोरफड जेल लावा, सौंदर्य समस्या होतील गायब...

कोरफड जेल हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. त्वचेची देखभाल करण्यासाठी हा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे. कोरफड जेलमधील पोषण तत्त्वांमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. कोरफडमध्ये औषधी गुणधर्मांचा साठा मोठ्या प्रमाणावर असतो. ज्यामुळे त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. कित्येक ब्युटी प्रॉडक्टमध्ये कोरफड जेलचा वापर केला जातो. ब्युटी प्रॉडक्टप्रमाणेच कोरफडचा गर देखील त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यास मदत करतो. या औषधी वनस्पतीमध्ये ७५ प्रकारचे घटक असतात. ज्यामध्ये मुख्यतः व्हिटॅमिन, खनिजे, सॅलिसिलिक अ‍ॅसिड, लिग्निन, सॅपोनिन यांचा समावेश असतो(Make PURE Aloe Vera Gel At HOME With NO CHEMICALS).

केमिकलयुक्त प्रॉडक्टमुळे होणारे दुष्परिणाम पाहता आजकाल प्रत्येकजण आता (How do you make aloe vera gel naturally?) आयुर्वेदिक, हर्बल उपचार करण्यावर भर देत आहेत. नैसर्गिक उपचारांमुळे चेहऱ्याला दीर्घकाळासाठी फायदे मिळतात. कोरफड ही एक जादुई आणि बहुगुणी वनस्पती आहे. ती केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर केस आणि शरीरासाठीही उपयुक्त आहे. कोरफड जेल हे त्वचेसाठी एक वरदानच आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर अँटी - एजिंग गुणधर्म आणि अँटी - ऑक्सिडेंट देखील असतात, ज्यामुळे ते आपली त्वचा दीर्घकाळ तरूण ठेवण्यास मदत करते. आजकाल बाजारात एलोवेरा जेलचे अनेक ब्रँड्स उपलब्ध आहेत. पण शक्य असल्यास (Make clear aloe vera gel at home) घरी कोरफडीचे रोप लावा आणि त्याचे जेल काढून त्वचेवर वापरा. ताजे घरगुती पद्धतीने काढलेले एलोवेरा जेल त्वचेवर अधिक प्रभावी ठरते. याचबरोबर  बाजारात उपलब्ध असलेल्या (Make Your Own Aloe Vera Gel At Home In Just 5 minutes) एलोवेरा जेलच्या शुद्धतेबद्दल १००% सांगता येत नाही. म्हणून, घरी ताजे एलोवेरा जेल काढा आणि त्याचा वापर केल्यास आपल्याला  चांगले परिणाम मिळतील. घरीच सोप्या स्टेप्स फॉलो करुन एलोवेरा जेल तयार करण्याची कृती पाहूयात(How to Make Aloe Vera Gel At Home?).

 एलोवेरा जेल तयार करण्याची कृती :- 

१. सर्वात आधी एलोवेराचे रोपटे घरीच असेल तर त्यातून एक मोठे पान काढून घ्यावे. २. नंतर हे पान स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्या मुळाचे टोक पाण्यांत भिजेल एवढे एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात थोडावेळ बुडवून ठेवावे. ३. आता सुरीच्या मदतीने या पानावरचे काटे व वरची साल काढून घ्यावी. ४. त्यानंतर चमच्याच्या मदतीने या पानांतील गर काढून एका बाऊलमध्ये घ्यावा. 

भरीव-दाट-रेखीव भुवयांसाठी खास उपाय, खोबरेल तेल आणि कलौंजी- भुवया होतील अतिशय सुंदर...

स्किन स्पेशालिस्ट सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत, केसगळती - पांढरे केस समस्याच संपतील...

५. आता एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यात हा गर घालून २ ते ३ सेकंद फिरवून घ्यावा. ६. यात बदाम तेलाचे ४ ते ५ थेंब घालावेत. ७. जर आपण हे जेल केसांसाठी वापरणार असाल तर यात टी - ट्री ऑईलचे काही थेंब घालावेत यामुळे केसांतील कोंडा नाहीसा होतो. यासोबतच आपण रोजमेरी किंवा पेपरमिंट ऑईलचे काही थेंब घालून देखील केसांच्या वाढीसाठी या जेलचा वापर करु शकता. 

फेशियलनंतर वाफ घेताना हमखास होणाऱ्या ४ चुका, फेशियल करूनही हमखास लागते चेहऱ्याची वाट...

नवरात्रात सुंदर दिसावं म्हणून चेहऱ्याला ब्लिच करताय ? ६ गोष्टी विसरु नका, चेहरा व्हायचा खराब...

हे एलोवेरा जेल कसे स्टोअर करून ठेवावे ?

आता हे जेल एका काचेच्या बाटलीत स्टोअर करुन फ्रिजमध्ये ठेवावे. हे घरगुती एलोवेरा जेल ३ ते ४ महिने फ्रिजमध्ये चांगले टिकून राहते. फक्त ते वापरण्याच्या किमान १ तास आधी बाहेर काढून ठेवावे. याचबरोबर ते नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरच त्याचा वापर करावा.

टॅग्स :ब्यूटी टिप्स