Lokmat Sakhi >Beauty > १ चमचा शुद्ध तूप घ्या आणि बनवा घरीच १०० % नैसर्गिक मॉइश्चरायझर, त्वचा होईल नितळ-चमकदार...

१ चमचा शुद्ध तूप घ्या आणि बनवा घरीच १०० % नैसर्गिक मॉइश्चरायझर, त्वचा होईल नितळ-चमकदार...

How To Make Ayurvedic Ghee Moisturizer At Home & Use It On Your Skin : महागडे मॉइश्चरायझर आपर बाजारातून विकत आणतो, त्यापेक्षा घरीच नॅचरल मॉइश्चरायझर करुन पाहा, त्वचेवर येईल चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2023 02:03 PM2023-05-13T14:03:44+5:302023-05-13T14:15:07+5:30

How To Make Ayurvedic Ghee Moisturizer At Home & Use It On Your Skin : महागडे मॉइश्चरायझर आपर बाजारातून विकत आणतो, त्यापेक्षा घरीच नॅचरल मॉइश्चरायझर करुन पाहा, त्वचेवर येईल चमक

how to make ayurvedic Moisturizer at home | १ चमचा शुद्ध तूप घ्या आणि बनवा घरीच १०० % नैसर्गिक मॉइश्चरायझर, त्वचा होईल नितळ-चमकदार...

१ चमचा शुद्ध तूप घ्या आणि बनवा घरीच १०० % नैसर्गिक मॉइश्चरायझर, त्वचा होईल नितळ-चमकदार...

आपली त्वचा कोणत्याही प्रकारची असली म्हणजे अगदी कोरडी, कॉम्बिनेशन किंवा तेलकट असली तरीही, त्वचा हायड्रेटेड असणे आवश्यक असते. जर त्वचा कोरडी होत असेल तर मॉइश्चरायझर हा एक उत्तम पर्याय ठरतो. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते. कोरड्या त्वचेमुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर मॉइश्चरायझर हा सर्वोत्तम उपाय आहे. आपण ज्यावेळी मॉइश्चरायझर निवडण्याचा विचार करतो त्यावेळी त्यात कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर केलेला नाही याची आपल्याला खात्री  करावी लागते. परंतु सध्या बाजारांत विकत मिळणाऱ्या सर्वच प्रकारच्या मॉइश्चरायझरमध्ये, कमी - अधिक प्रमाणांत रसायनांचा वापर केलेला असतोच. 

सहसा आंघोळ केल्यावर त्वचेची छिद्रं मोकळी होतात. अशावेळी मॉइश्चरायझर लावल्याने ते त्वचेत लवकर मुरतं. नियमित मॉइश्चरायझर लावण्याची सवय केल्यास आपली त्वचा लवकर कोरडी पडत नाही. कोरड्या त्वचेवर सुरूकुत्या लवकर निर्माण होतात, त्यामुळे लवकर सुरकुत्या येऊ नयेत यासाठी त्वचेला मॉइश्चरायझर लावून  मऊ ठेवले पाहिजे. कोरड्या आणि खडबडीत त्वचेचा सगळ्यांनाच खूप त्रास होतो, म्हणूनच शक्यतो उन्हाळ्यांत आणि हिवाळ्यांत त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. आपली त्वचा मॉइश्चराइज करण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या महागड्या मॉइश्चरायझरचा वापर करतो. परंतु त्यात असणाऱ्या केमिकल्समुळे ते आपल्या त्वचेला हानिकारक ठरु शकते. यासाठी आपण घरच्या घरी बनवलेल्या तुपापासून शुद्ध १००% नैसर्गिक मॉइश्चरायझर बनवू शकतो(How To Make Ayurvedic Ghee Moisturizer At Home & Use It On Your Skin).     

घरगुती तुपाचे मॉइश्चरायझर नेमकं कस बनवावं ? 

घरगुती तुपाचे मॉइश्चरायझर बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोनच गोष्टींची गरज लागणार आहे. घरगुती शुद्ध तूप आणि बर्फाचे थंडगार पाणी यांचा वापर करुन आपण शुद्ध १००% नैसर्गिक मॉइश्चरायझर घरच्या घरी बनवू शकतो. एका मोठ्या बाऊलमध्ये १ मोठा टेबलस्पून तूप घ्यावे. या तुपात बर्फाचे थंडगार पाणी ओतावे. आता हे मिश्रण चमच्याने एकसारखे ढवळत राहावे. त्यानंतर त्यातील जास्तीचे पाणी काढून टाकावे. मग हे मिश्रण एका पसरट भांडयांमध्ये ओतून घ्यावे. परत हे मिश्रण चमच्याने गोल गोल फिरवून चांगले फेटून घ्यावे. फेटून झाल्यावर मिश्रण घट्ट होत आले की त्यातील जास्तीचे पाणी ओतून टाकावे. त्यानंतर त्यात परत थोडे थंड पाणी ओतून घ्यावे व परत तसेच फेटावे. त्यानंतर जास्तीचे पाणी ओतून टाकावे. हे मिश्रण फेटून घट्ट क्रिमसारखे एकसंध होईपर्यंत फेटून घ्यावे. असे किमान ५ ते ६ वेळा तरी करुन घ्यावे. सर्वात शेवटी जेव्हा त्याची फेटून पांढरी शुभ्र क्रिम तयार होईल तेव्हा मॉइश्चरायझर बनून तयार असेल.  आयुर्वेदानुसार, आपण जर ही तूप फेटून घेण्याची प्रक्रिया तांब्याच्या भांड्यात केली तर ते अधिक उत्तम होते. हे एका काचेच्या बरणीत स्टोअर करून फ्रिजमध्ये  ठेवावे. किमान १५ ते २० दिवस पुरेल असे घरगुती मॉइश्चरायझर एकाच वेळी बनवून ठेवावे.  

तांदूळ व मसूर डाळीचा डी - टॅन फेसमास्क, उन्हानं झालेलं टॅनिंग चुटकीसरशी गायब, त्वचा दिसेल चमकदार...

  

आठवडभरात गायब होतील डोळ्याखालची काळी वर्तुळं, बघा घरगुती आय मास्कची जादू....

त्वचा मॉइश्चराइज करण्याचे फायदे :-  

१. एजिंगची लक्षणे कमी करण्यासाठी त्वचा मॉइश्चराइज करणे गरजेचे असते.  आपण एवोकॅडो वापरू शकता. ते तुमच्या त्वचेला पोषक ठेवण्यास मदत करते. तसेच सुरकुत्यापासून मुक्त होण्यास मदत होते. याशिवाय, ते त्वचा मऊ व तजेलदार बनवते. 

२. कोरड्या त्वचेला अतिरिक्त काळजी घेण्याची गरज असते कारण ती स्वतःहून नैसर्गिकरित्या तेल तयार करू शकत नाही त्यामुळे तिच्यावर सुरकुत्या येणे किंवा अकाली वृध्दत्व येणे यासारखे परिणाम दिसू लागतात, यासाठी त्वचा मॉइश्चराइज करणे गरजेचे असते. 

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

कोरफड म्हणजे उन्हाळ्यात वरदान, ७ प्रकारे कोरफड वापरा- उन्हामुळे होणारे त्रास होतील पटकन कमी...

४. कोणत्याही ऋतूत सुंदर त्वचेसाठी मॉइश्चरायझर आवश्यक आहे. दररोज मॉइश्चरायजर वापरल्याने त्वचेला निरोगी चमक मिळेल आणि खोलवर ओलावा मिळेल. 

५. आपली त्वचा स्वतःहून ओलावा शोषून घेऊ शकत नाही, म्हणूनच त्वचेवर वारंवार मॉइश्चरायझर लावावे.

Web Title: how to make ayurvedic Moisturizer at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.