आजकाल बरेच जण कमी वयात वयस्कर दिसू लागले आहे, आणि याला कारणीभूत ठरते बिघडलेली जीवनशैली. अकाली केस पांढरे होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या, हाडं दुखणे, यासह विविध समस्या निर्माण होतात. मुख्य म्हणजे कमी वयात केस पांढरे होत असल्यामुळे बऱ्याचदा चारचौघात लाजिरवाणे वाटू लागते (Beauty Tips). पांढरे केस काळे करण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्यात येतो. पण या उत्पादनांमुळे केस काळे होण्याऐवजी केस गळती, केसात कोंडा, यासह इतर समस्या निर्माण होतात (Hair care Tips).
केस काळे करण्यासाठी केमिकल डाय किंवा मेहेंदीचा वापर करण्यापेक्षा, आपण नारळाच्या शेंड्यांचा वापर करू शकता. पण याचा वापर हेअर डाय तयार करण्यासाठी कसा करावा? पाहूयात(How to make black hair with coconut shells).
ब्रायडल गोल्डन ग्लो हवाय? मग मधात मिसळा २ गोष्टी; दिसाल इतके सुंदर की..
नारळाच्या शेंड्यांचा वापर करून तयार करा हेअर डाय
नारळाच्या शेंड्यांचा वापर आपण सहसा करत नाही. फेकून देतो. पण याच्या वापराने आपण हेअर डाय तयार करू शकता. यासाठी लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर नारळाच्या शेंड्या घालून भाजून घ्या. नारळाच्या शेंड्यांचा रंग काळा झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्याची पावडर तयार करा.
तयार पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात खोबरेल तेल, एलोवेरा जेल किंवा मोहरीचे तेल देखील मिक्स करू शकता. १० मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. जेणेकरून डाय योग्यप्रकारे वापरण्यास तयार होईल.
थ्रेडिंग नको वाटतं? लिंबाच्या रसात मिसळा २ गोष्टी, चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढण्याची सोपी ट्रिक
हेअर डाय लावण्याची योग्य पद्धत
केसांना हेअर डाय लावण्यासाठी केस विंचरून घ्या. तयार डायमध्ये ब्रश बुडवून केसांना रंगवा. २० ते ३० मिनिटांसाठी केसांवर डाय तसेच ठेवा. ३० मिनिटानंतर केस पाण्याने धुवून घ्या. अशा प्रकारे केसांवर नैसर्गिक रंग चढेल.