आपल्याला माहितीच आहे की हिवाळ्यात त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसांत त्वचा कोरडी पडते. त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे या दिवसांत त्वचेची शक्य तेवढी काळजी घेऊन ती माॅईश्चराईज ठेवणं गरजेचं असतं. पण आपल्या हाताच्या बाबतीत नेमकं असं होतं की घरकामामुळे ते वारंवार पाण्यात घालावे लागतात. भांडी, कपडे धुताना किंवा स्वच्छतेची इतर कामं करताना त्यांचा वारंवार पाण्याशी संपर्क येतो. त्यामुळे मग त्यांच्यातलं नॅचरल माॅईश्चर कमी होऊन ते अधिकच कोरडे होऊ लागतात. हिवाळ्यात तर ही समस्या जरा जास्तच जाणवते. त्यामुळेच मग हात सुरकुतल्यासारखे होतात आणि कमी वयातच अगदी वयस्कर व्यक्तींप्रमाणे दिसू लागतात (how to get rid of wrinkles on hand?). म्हणूनच आता पुन्हा एकदा हातांना छान तरुण करून त्याचं सौंदर्य खुलविण्यासाठी (how to make body scrub at home?) हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(best home remedy for removing tanning and dead skin)
हात तरुण, सुंदर दिसण्यासाठी घरगुती स्क्रब कसा तयार करावा?
हातावरचं टॅनिंग, डेडस्किन काढून त्यांना छान माॅईश्चराईज करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येतो, याविषयीची माहिती meghnasfoodmagic या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
९० टक्के लोक रताळ्याचे पदार्थ खाताना 'ही' चूक करतात! रताळ्यातले पौष्टिक घटक शरीराला मिळण्यासाठी....
यामध्ये घरातलेच पदार्थ वापरून एक घरगुती स्क्रब तयार करायला सांगितला आहे. हा स्क्रब तुम्ही फक्त हातांसाठीच नाही तर संपूर्ण अंगासाठी एखाद्या उटण्याप्रमाणे वापरू शकता.
घरगुती बॉडी स्क्रब तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी १ कप मसूर डाळ आणि अर्धा कप तांदूळ घ्यायचे आहेत. त्यांना जर तुम्ही पावडर लावून ठेवली असेल तर ते आधी स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर एका कपड्यावर पसरवून ठेवून वाळू द्या.
डाळ तांदूळ वाळल्यानंतर ते मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या. ही पावडर एका भांड्यात काढा आणि त्यामध्ये २ टीस्पून हळद, ३ टेबलस्पून मुलतानी माती आणि ३ टेबलस्पून बेसन टाका. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवा. हा झाला तुमचा स्क्रब तयार. हा स्क्रब एखाद्या एअरटाईट डबीमध्ये भरून ठेवा.
मकर संक्रांत: काळ्या साडीवर ब्लाऊज शिवणं झालं नाही? ५ रंगाचे ब्लाऊज ट्राय करा- स्टायलिश दिसाल
आता जेव्हा तुम्हाला हा स्क्रब वापरायचा असेल तेव्हा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तो एका वाटीमध्ये घ्या. त्यामध्ये मध आणि दही टाकून त्याचा लेप तयार करा. हा लेप हाताला तसेच सगळ्या अंगाला लावा आणि हलक्या हाताने चोळून मसाज करा. त्यानंतर साधारण ५ ते ७ मिनिटांनी स्क्रब धुवून टाका. यामध्ये तुम्ही कच्चं दूध, लिंबाचा रस, गुलाबपाणी असे पदार्थही टाकू शकता.