प्रत्येकालाच घनदाट-लांबसडक केस हवे असतात. परंतु बाहेरचे प्रदूषण, बदलेली जीवनशैली, वाढता ताण, सततची चिंता आणि जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन याचा परिणाम आरोग्यासह आपल्या केसांवरही होतो.(chemical free conditioner) आपले केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी बाजारात आलेल्या नवीन कंडिशनरचा वापर सहज करतो. परंतु, यात असणारे रसायन आपल्या केसांना अधिक नुकसान पोहोचवते. अनेकदा तर कंडिशनर आपल्या केसांना रुचत नाही. त्यामुळे केस चमकदार होण्याऐवजी ते तुट लागतात किंवा गळतात. (hair growth mask)
शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर लावणं असा सल्ला आपल्याला अनेकांकडून मिळालाच असेल. (dry hair conditioner) शॅम्पू केल्यामुळे घाण, धूळ निघून जाण्यास मदत होते. तसेच केसातील तेल काढून टाकते. शॅम्पूनंतर कंडिशनर केसांसाठी पोषक तत्व तयार करते. हे केसांना लावल्यामुळे बाहेरील प्रदूषणापासून त्याचे संरक्षण होते. केसातील कोरडेपणा आणि रुक्षपणा कमी होतो. केस मऊ आणि चमकदार होतात. जर तुम्हालाही केमिकलयुक्त होममेड कंडिशनर बनवायचं असेल तर या सोप्या पद्धतीने बनवा.
कुरळे केस सतत ड्राय होतात? ४ सोपे उपाय, केस होतील सिल्की आणि शायनी
वर्षा गायकवाड या इंस्टाग्राम पेजने सोशल मीडियावर घरच्या घरी सोप्या पद्धतीने केमिकलयुक्त कंडिशनर कसं बनवायचं हे सांगितलं आहे. तसेच या कंडिशनरमुळे केस सॉफ्ट आणि चमकदार होतील,केसगळती देखील थांबेल. पाहूया कंडिशनर कसं बनवायचं
साहित्य तांदळाचे पीठअळशीमेथी दाणेकोरफड जेल खोबऱ्याचे तेल
बनवण्याची पद्धत जर तुम्हाला लांब, घनदाट आणि स्फॉट केस हवे असतील तर वाटीत पाणी घेऊन तांदळाची पेस्ट तयार करा. कढईत पाणी तापत ठेवून त्यात तांदळाची पेस्ट, अळशी आणि मेथी दाणे घालून उकळी येऊ द्या. तयार मिश्रण चाळणीने गाळून घ्या.मिश्रण थंड झाले की, त्यात कोरफड जेल आणि खोबऱ्याचे तेल घाला. चमच्याने चांगले ढवळून एकजीव करा. यानंतर मिश्रण चांगले गार होईल. केस धुण्यापूर्वी ४० मिनिटे कंडिशनर केसांना लावा. त्यानंतर केस शॅम्पूने धुवा. यामुळे केसांना नव्यासारखी चमक येईल. असं आठवड्यातून दोनदा केल्याने केस मुलायम तर राहातील पण केसगळती देखील थांबेल.