Lokmat Sakhi >Beauty > केस गळणं थांबतच नाहीये? जास्वंदाचं हेअर कंडिशनर बनवून लावा; लांबसडक होतील केस

केस गळणं थांबतच नाहीये? जास्वंदाचं हेअर कंडिशनर बनवून लावा; लांबसडक होतील केस

How to make Conditioner for Hair Growth : हेअर एक्सपर्ट्सकडे जाणं महागड्या ट्रिटमेंट्स, औषधांचा खर्च हे अनेकासांठी खर्चिक ठरू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 08:33 AM2023-06-02T08:33:18+5:302023-06-02T16:40:42+5:30

How to make Conditioner for Hair Growth : हेअर एक्सपर्ट्सकडे जाणं महागड्या ट्रिटमेंट्स, औषधांचा खर्च हे अनेकासांठी खर्चिक ठरू शकतं.

How to make Conditioner for Hair Growth : Homemade Hibiscus Conditioner for soft hydrated hair : | केस गळणं थांबतच नाहीये? जास्वंदाचं हेअर कंडिशनर बनवून लावा; लांबसडक होतील केस

केस गळणं थांबतच नाहीये? जास्वंदाचं हेअर कंडिशनर बनवून लावा; लांबसडक होतील केस

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना त्वचा आणि केसांच्या समस्या उद्भवतात. मात्र या समस्यांकडे लक्ष दिल्यास त्रास वाढतो आणि नैराश्य येतं. (Hair Care tips) स्त्रीयांप्रमाणे पुरूषांनाही केस गळण्याच्या त्रासाला तोंड द्यावे लागते. हार्मोनल बदल, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर, आहारात पौष्टीक घटकांची कमतरता या कारणांमुळे केस गळू शकतात. (How to make Conditioner for Hair Growth) आजकाल तज्ज्ञांकडून केसांची हेअर टेस्ट केली जाते आणि त्यानुसार उपाय सुचवले जातात. पण हेअर एक्सपर्ट्सकडे जाणं महागड्या ट्रिटमेंट्स, औषधांचा खर्च हे अनेकासांठी खर्चिक ठरू शकतं. (Homemade Hibiscus Conditioner for soft hydrated hair) 

आयुर्वेदात केसांचं गळणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपायांचाही उल्लेख आहे. घरगुती उपायांचे साईड इफेक्ट्स जाणवत नाहीत आणि कमी खर्चात केसांवर चांगला परिणाम दिसून येतो.  जास्वंदाच्या तेलाचा वापर अनेकजण केस वाढवण्यासाठी करतात. याचे कंडीशनरसुद्धा डोक्यावर लावणं फायदेशीर ठरतं. (Effective Ways To Use Hibiscus For Your Hair)

जास्वंदाच्या फुलाचं कंडिशनर बनवण्यासाठी सगळ्यात आधी पाण्यात जास्वंद स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून घ्या. यात पुन्हा पाणी घालून १ दिवसासाठी जास्वंद भिजवा.  १ दिवसानंतर जास्वंद आणि त्याचे लाल पाणी गाळून वेगळे करा. मिक्सरमध्ये ही फुलं घालून बारीक दळून  घ्या. जास्वंदाच्या फुलांची ही पेस्ट  सुरूवातीला वेगळ्या काढलेल्या लाल पाण्यात एकत्र करा नंतर एका स्वच्छ भांड्यात गाळून घ्या. गाळणीतील पेस्ट बदामाच्या तेलात मिसळा. प्रिजर्व्हेटिव्ह्जसाठी ३० ml बायो एंजाईम्स घालू शकता. तयार आहे जास्वंदाचं कंडिशनर.

जास्वंदाच्या फुलाचा असा करा वापर

या फुलांमध्ये अमीनो ऍसिड असतात जे केसांचे पोषण करतात आणि त्यांची वाढ वाढवतात. हे अमीनो एसिड केस मजबूत बनवणारे केराटिन नावाचे विशेष प्रकारचे स्ट्रक्चरल प्रोटीन तयार करतात. हिबिस्कस पावडर आणि आवळा पावडर समान प्रमाणात घ्या आणि पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि केसांना 40 मिनिटे लावा. नंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा.

कडुलिंबाची पाने बारीक करून कडुलिंबाचा रस काढा आणि नंतर हिबिस्कसची पाने बारीक करून रस काढा. आता हे दोन्ही मिसळा आणि 20 मिनिटे टाळूवर लावा. यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून दोनदा लावा. यामुळे केस आणि टाळू दोन्ही निरोगी राहतात.

Web Title: How to make Conditioner for Hair Growth : Homemade Hibiscus Conditioner for soft hydrated hair :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.