रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन...पाऊस पडला की हमखास हे गाणं आठवतं. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह गारवा जाणवत आहे. रिमझिम सरींसोबत वाफाळलेला चहा आणि भजी खायला मिळाली तर, आणखी मज्जा येते. या ऋतूमध्ये अनेक प्रकारची भजी केली जाते. कांदा भजी, बटाटे भजी, मूग भजी, पनीरची भजी, पण आपण कधी पोह्यांची भजी खाऊन पाहिली आहे का?
पोह्यांचा वापर फक्त कांदे पोहे करण्यासाठी होतो. त्याचा वापर क्वचितच इतर पदार्थात केला जातो. पण आपल्याला जर कांदे - पोहे व्यतिरिक्त हटके पदार्थ खायची इच्छा झाली असेल तर, पोह्यांची क्रिस्पी भजी ही रेसिपी ट्राय करून पाहा(How To Make Crispy Poha pakoda At Home).
पोह्यांची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य
पोहे
तांदळाचे पीठ
बेसन
मूठभर शेंगदाण्याची करा झणझणीत ओली चटणी! इडली-डोसा-पराठ्यांसोबत अशी चटणी म्हणजे नाश्ता फक्कड
हिरवी मिरची
लसूण
मीठ
कांदा
हळद
लाल तिखट
कडीपत्ता
तेल
कृती
सर्वप्रथम, चाळणीत एक कप पोहे घ्या, त्यात पाणी घालून पोहे भिजवून घ्या. ज्याप्रमाणे आपण कांदे - पोह्यांसाठी पोहे भिजत घालतो, त्याचप्रमाणे पोहे भिजवून घ्यायचे आहे. आता भिजवलेले पोहे एका बाऊलमध्ये काढून घ्या, त्यात एक चमचा तांदळाचे पीठ, एक चमचा बेसन, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, एक चमचा लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कडीपत्ता घालून हाताने साहित्य एकजीव करा.
खमंग खुसखुशीत खांदेशी बट्टी करण्याची सोपी रेसिपी, होऊन जाऊ द्या डाळ बट्टीचा मस्त बेत
दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात पोह्यांच्या मिश्रणाच्या छोटे - छोटे गोळे तयार करून भजी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे पोह्यांची कुरकुरीत भजी खाण्यासाठी रेडी.