Join us  

विंचरताना केसांचे पुंजकेच्या पुंजके हातात येतात? १० रुपयांच्या कडीपत्त्याचे करा घरीच हेअर ऑइल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 1:05 PM

How to make curry leaf hair oil to get rid of hair fall : रोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा कडीपत्ता फोडणीत घातल्यानंतर पदार्थाची चव बदलते. तसंच केसांसाठीही कडीपत्ता खुपच गुणकारी आहे.

लांब, दाट केस तुमचं सौंदर्य वाढवण्यात मदत करतात. सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये खाणं-पिणं, प्रदूषण आणि केसाचं गळणं खूपच कॉमन झालं. वाढत्या वयात केसही पातळ होत जातात. (Hair Growth With These Homemade Hair Oils) यामुळे तुमच्या केसांवर टक्कल पडू शकतं.  स्वयंपाकघरातील काही पदार्थ तुम्हाला या समस्येवर चांगलं सोल्यूशन देऊ शकतात. (How to make homemade hair oil for hair growth)

रोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा कडीपत्ता फोडणीत घातल्यानंतर पदार्थाची चव बदलते. तसंच केसांसाठीही कडीपत्ता खुपच गुणकारी आहे. कडीपत्त्याचे तेल केसांना लावून तुम्ही लांबसडक, दाट केस मिळवू शकता. कडीपत्त्याचं हे तेल घरी कसं बनवायचं  हे पाहूया. (Hair Care Tips)

कडीपत्त्याचं हेअर ऑईल बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक पॅन घ्या. त्यात ४ ते ५ चमचे नारळाचं तेल घालून तेल गरम करून घ्या. साधारण १ मिनिटं तेल गरम झाल्यनंतर त्यात मूठभर कडीपत्त्ते घाला आणि रंग बदलेपर्यंत मंद आचेवर परतवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून तेल थंड होऊ द्या. 

नंतर हे तेल एका बरणीत भरा. गळणाऱ्या केसांवर उपयुक्त असं हेअर ऑईल तयार आहे. कडीपत्त्याचं तेल केसांच्या मुळांना व्यवस्थित लावा. नंतर हलक्या हातानं  केसांना १ तासापर्यंत मसाज करा. त्यानंतर केस धुवून केसांची मसाज करा.  चांगल्या  रिजल्टसाठी २ ते ३ वेळा केसांना हे तेल लावा.

1) कढीपत्त्यात असलेले अँटीऑक्सिडंट केस मजबूत बनवतात आणि केस गळणे थांबवतात. याशिवाय, स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण वाढवून, केसांना मुळापासून मजबूत करते. 

वय कमी ,पण चेहरा वयस्कर दिसतो? किचनमधले ३ पदार्थांचा फॉर्म्यूला; सुरकुत्या येणारच नाही

2) तुमच्या केसांमध्ये जास्त कोंडा असल्यास त्यावर उपाय करण्यासाठी कडीपत्ता बारीक करून त्यात दही घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण टाळूवर लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवा.

डार्क सर्कल्स कमीच होत नाहीत? फक्त १ बटाटा किसून करा सोपा उपाय, चेहऱ्यावर येईल चमक

3) कडीपत्ता केस लवकर पांढरे होऊ देत नाही, म्हणून ते नियमितपणे वापरावे. ताज्या कढीपत्त्याची पेस्ट मेहेंदीत मिसळून लावल्याने केस मजबूत आणि सुंदर दिसतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स