Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीची साफसफाई करुन निस्तेज झालेल्या त्वचेवर येईल इन्स्टंट ग्लो! फक्त वापरा हा बर्फाचा खडा...

दिवाळीची साफसफाई करुन निस्तेज झालेल्या त्वचेवर येईल इन्स्टंट ग्लो! फक्त वापरा हा बर्फाचा खडा...

How To Make Flaxseed Ice Cubes For Skin : Flaxseed Ice Cubes for Glowy Skin : Flaxseed Ice Facial Recipe for glass skin : Flaxseed Ice Cube Recipe for clear & natural skin : अळशी वापरुन ऐन दिवाळीत काळवंडलेली त्वचाही होईल झटपट फेस्टिव्ह रेडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 08:37 PM2024-10-29T20:37:29+5:302024-10-31T19:06:14+5:30

How To Make Flaxseed Ice Cubes For Skin : Flaxseed Ice Cubes for Glowy Skin : Flaxseed Ice Facial Recipe for glass skin : Flaxseed Ice Cube Recipe for clear & natural skin : अळशी वापरुन ऐन दिवाळीत काळवंडलेली त्वचाही होईल झटपट फेस्टिव्ह रेडी...

How To Make Flaxseed Ice Cubes For Skin Flaxseed Ice Cubes for Glowy Skin Flaxseed Ice Facial Recipe for glass skin Flaxseed Ice Cube Recipe for clear & natural skin | दिवाळीची साफसफाई करुन निस्तेज झालेल्या त्वचेवर येईल इन्स्टंट ग्लो! फक्त वापरा हा बर्फाचा खडा...

दिवाळीची साफसफाई करुन निस्तेज झालेल्या त्वचेवर येईल इन्स्टंट ग्लो! फक्त वापरा हा बर्फाचा खडा...

दिवाळी निमित्त घराची साफसफाई, खरेदी, फराळ तयार करणे अशी अनेक काम करुन आपण थकतो. आपल्याला आलेला हा थकवा आपल्या चेहऱ्यावर देखील तितकाच स्पष्ट दिसतो. आपल्या शरीरासोबतच त्वचा देखील या सगळ्या कामात पूर्णपणे थकून जाते. सणावाराच्या निमित्ताने कराव्या लागणाऱ्या या सगळ्या तयारीत आपली फारच धावपळ (Flaxseed Ice Cubes for Glowy Skin) आणि घाईगडबड होते. यामुळे आपल्याला स्वतःकडे नीट लक्ष द्यायला किंवा स्किनकेअर योग्य पद्धतीने करायला पुरेसा वेळच मिळत नाही. यामुळे त्वचेचे मोठे नुकसान होऊन त्वचेसंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ऐन सणावाराला आपली त्वचा अशी डल, निस्तेज दिसलेली कुणालाही आवडणार नाही. अशावेळी मग इंस्टंट उपाय म्हणून ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंट घेणे किंवा महागडी केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरणे असे अनेक पर्याय आपण करुन पाहतो(How To Make Flaxseed Ice Cubes For Skin).

बरं या सगळ्याचा नक्की स्किनसाठी फायदा होईल का ते सुद्धा सांगता येत नाही, म्हणजे नुकसान आपलंच असतं. अशा परिस्थितीत, आपण एक घरगुती खास करु शकतो. हा एक असा उपाय आहे ज्यामुळे तुम्ही वेळ नसतानाही अगदी झटपट आपल्या त्वचेला रिफ्रेश करुन फेस्टिव्ह रेडी होऊ शकता. हा खास उपाय आहे थंडगार बर्फाचा! हा त्वचेला रिफ्रेशमेंट करुन झटपट तुम्हाला हटके फेस्टिव्ह लूकसाठी तयार करु शकतो. हा जादुई बर्फ कसा तयार करायचा ते पाहूयात( Flaxseed Ice Cube Recipe for clear & natural skin).

साहित्य :-

१. अळशीच्या बिया - १ कप 
२. पाणी - २ कप 

सतत केस गळून विरळ झालेत ? टक्कल दिसतंय? 'या' ४ तेलांचे मिश्रण करेल जादू, केसांची होईल वाढ...


पायांच्या घोट्यांचा काळपटपणा जात नाही? करा घरगुती असरदार उपाय, पार्लरला जायची गरजच नाही...

कृती :-

१. सर्वातआधी एक पॅन घेऊन त्यात पाणी ओतून, पाण्याला हलकेच एक उकळी येईपर्यंत गरम करुन घ्यावे. 
२. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात अळशीच्या बिया घालाव्यात. 
३. पाणी आणि अळशीच्या बियांचे हे मिश्रण चमच्याच्या मदतीने सतत हलवत राहावे. 
४. हे मिश्रण जोपर्यंत थोडेसे चिकट आणि जेलसारखे घट्ट, दाटसर होत नाही तोपर्यंत चमच्याने गॅसच्या मंद आचेवर ठेवून हलवत राहावे. 
५. या पॅनमधील मिश्रणाला थोडासा चिकटपण आल्यावर गॅस बंद करुन हे मिश्रण बर्फाच्या ट्रे मध्ये भरुन घ्यावे. 
६. मिश्रण थोडे गार होऊ द्यावे. हे मिश्रण संपूर्णपणे गार झाल्यावर ते ४ ते ५ तास फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यावे. 

या बर्फाचा वापर कसा करावा ? 

जेव्हा आपल्याला या बर्फाने स्किन मसाज करायचा असेल तेव्हा यातील एक बर्फाचा खडा घेऊन मसाज करावा. शक्यतो सकाळी उठल्यानंतर या बर्फाने स्किनला मसाज करावा. हा बर्फ त्वचेवर वेगवेगळ्या रोटेशनमध्ये ५ ते ६ वेळा फिरवून घ्यावा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. 

अळशीच्या बियांमध्ये ओमेगा - ३ फॅटी अ‍ॅसिड आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वांचे प्रमाण हे अधिक असते. ज्यामुळे त्वचेची हरवलेली चमक, आणि एजिंगच्या खुणा, सुरकुत्या, रिंकल्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. जर आपण अळशीच्या बियांचा वापर त्वचेसाठी नियमित करत असाल तर त्वचेवरील एजिंगच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते.

Web Title: How To Make Flaxseed Ice Cubes For Skin Flaxseed Ice Cubes for Glowy Skin Flaxseed Ice Facial Recipe for glass skin Flaxseed Ice Cube Recipe for clear & natural skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.