Lokmat Sakhi >Beauty > केस लवकर पांढरे झाले? पिकलेल्या केसांसाठी १ ट्रिक वापरा, म्हातारपणातही केस राहतील काळे

केस लवकर पांढरे झाले? पिकलेल्या केसांसाठी १ ट्रिक वापरा, म्हातारपणातही केस राहतील काळे

How to make hair black naturally permanently : केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर केसांची वाढ चांगली होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 12:18 PM2023-05-26T12:18:53+5:302023-05-26T12:32:27+5:30

How to make hair black naturally permanently : केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर केसांची वाढ चांगली होईल.

How to make hair black naturally permanently : Home Remedies For Darken Grey Hair | केस लवकर पांढरे झाले? पिकलेल्या केसांसाठी १ ट्रिक वापरा, म्हातारपणातही केस राहतील काळे

केस लवकर पांढरे झाले? पिकलेल्या केसांसाठी १ ट्रिक वापरा, म्हातारपणातही केस राहतील काळे

लांबसडक, दाट केस प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात. सध्याच्या स्थितीत केस काळेभोर मिळणं कठीण झालं आहे. केसांवर वेगवेगळे केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरल्यानं केस वेळेआधीच पांढरे होतात. (How to turn white hairs to black Tips) अशावेळी केसावंर काय लावल्यास केस पुन्हा आधीसारखे होतील हे कळत नाही. केस काळे करण्यासाठी बाजारात अनेक तेलं, शॅम्पू उपलब्ध आहेत. केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर केसांची वाढ चांगली होईल आणि केस कायम काळेभोर राहतील. (How to Take Care of your Hairs)

१) चुकीच्या उत्पादनांचा वापर करू नका

कोणत्या उत्पादनाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय अशा प्रोडक्ट्सचा वापर करू नका. केमिकल्सयुक्त उत्पादनांमुळे कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. 

२) हेअर केअर रूटीन

केसांची काळजी घेण्यासाठी एखादं हेअर केअर रूटीन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर कमी वयातच केस पांढरे व्हायला सुरूवात होते.

३) हेअर  ट्रिटमेंट

केसांना सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या हेअर ट्रिटमेंट्सचा वापर केला जातो.  या ट्रिटमेंट्समुळे केसाचं नुकसान होऊ शकतं. केमिकल्समुळे केस खराब होतात.  त्याऐवजी तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा केस काळे करण्यासाठी वापर करावा.

दंड, हाताची बोटं काळवंडली? १० रूपयात पार्लरसारखं मेनिक्युअर घरीच करा-ग्लोईंग दिसेल त्वचा

४) हेअर कलर

हेअर कलर केल्यानंतर तुमचा लूक पूर्णपणे बदलतो. यामुळे केस निस्तेज आणि कोरडे दिसतात. जसजसा  केसांचा रंग निघत जातो तसतसं केस पुन्हा खराब दिसतात. म्हणून हेअर कलरची निवड काळजीपूर्वक करा.

१ चमचा मेथीचा थ्री इन वन फॉर्म्यूला; केसांची वाढ होईल भराभर, कोंडा-पांढऱ्या केसांचा त्रास टळेल

५) हेअर स्पा घ्या

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हेअर स्पा घेऊ शकता. पंधरा दिवसातून एकदा हेअर स्पा केल्यानं केसांवर नव्यासारखी चमक येईल आणि केसाचं गळणंही थांबेल.

५) पोषक तत्वांची कमतरता

पोषक तत्वांची कमतरता असणं हे केस पांढरे होण्याचं कारण ठरू शकतं. आयर्न, व्हिटामीन डी, फॉलेट, व्हिटामीन बी, सेलेनियची कमतरता केसांच्या समस्यांचे कारण ठरू शकते. म्हणून प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

Web Title: How to make hair black naturally permanently : Home Remedies For Darken Grey Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.