केस गळण्याची समस्या आजकाल तरूण-तरूणींमध्ये जास्त दिसून येते. ताण तणावामुळे, हॉर्मोनल बदलांमुळे तर कधी पार्लर ट्रिटमेंट्सचा साईड इफेक्ट म्हणून केस गळतात. केस गळणं वाढलं की नवीन केस पुन्हा कधी येतील याची चिंता असते. (Hair Fall Control Tips) केसांचं गळणं कमी करण्यासाठी आजकाल बाजारात बरीच उत्पादनं उत्पादनं उपलब्ध आहे. (Hair Care Tips)
प्रत्येकाच्या केसांचा पोत वेगवेगळा असल्यामुळे ही उत्पादनं सर्वच प्रकारच्या केसांवर परिणामकारक ठरतात असं नाही. (How to Make Hair Oil for Stop Hair Fall) केस गळणं थांबवण्यासाठी घरच्याघरी तेल बनवणं एकदम सोपं आहे. घरी तेल कसं तयार करायचं ते पाहूया. (How to make hair oil at home)
1) केस गळती कमी करण्याचे हेअर ऑईल बनवण्याासठी सगळ्यात आधी एका ताटात, ताजं एलोवेरा जेल किंवा एलोवेराचे तुकडे घ्या, त्यात कांदा, कढीपत्ता, मेथीच्या बीया, कलौंजी बीया, आळशीच्या बीया आणि रोजमेरी एकत्र करा. त्यात नारळाचं तेल घाला. तुम्ही यात कॅस्टर ऑईल किंवा ऑलिव्ह ऑईलसुद्धा घालू शकता.
२) मंद आचेवर तेल उकळण्यासाठी ठेवा. सर्व पदार्थ गोल्डन झाल्यानंतर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यानंतर हे गाळून एका बरणीत भरा. आठवड्यातून २ ते ३ वेळा या तेलाने केसांची मालिश करा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि केस गळणं आपोआप थांबेल. केसांची वाढ दुप्पटीने होईल. बाहेरील केमिकल्सयुक्त तेलांपेक्षा या तेलाने केसांची वाढ चांगली होईल. केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहील. या तेलाने अकाली केस पांढरे होण्याची समस्या उद्भवत नाही.
दिवसरात्र गळून केस विरळ झाले? किचनमधले ३ पदार्थ 'या' पद्धतीनं लावा, दाट होतील केस
हे तेल केसांना लावण्याचे फायदे
या तेलात मॉईश्चरायजिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे केस कोरडे होत नाहीत. केसांवर नियमित नारळाचं तेल लावल्याने केस चांगले राहतात. केसांना वेगळी चमक येते. नारळाच्या तेलात लॉरिक एसिड असते. जे केसांच्या मुळाशी जाऊन पोषण देते. यामुळे केस हायड्रेट राहतात आणि केसांचा फ्रिजीनेस कमी होऊन केस वॉल्युमिनस दिसतात.
गौरी-गणपतीत चेहऱ्यावर तेज हवंय? पार्लरला न जाता घरी करा ४ उपाय, नितळ त्वचा-ग्लोईंग चेहरा
नारळाचे तेल केसांच्या मुळांना मजबूत बनवते यामुळे केस तुटणं बंद होतं. जर स्काल्प कोरडा असेल तर नारळाचं तेल लावल्यास केसांचा कोरडेपणा कमी होतो. नारळाच्या तेलात एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. जर स्काल्पमध्ये कोणतीही एलर्जी किंवा इन्फेक्शन असेल तर नारळाचं तेल फायदेशीर ठरतं. स्काल्प इन्फेक्शनशी लढण्यासाठी नारळाचं तेल नियमित वापरायला हवं.