Join us  

डोक्यावर एकही पांढरा केस दिसणार नाही- फक्त ३ पदार्थ वापरून तयार करा हर्बल डाय, केस काळेभोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2024 2:07 PM

How to Make Herbal Hair Colour At Home: केमिकल्स असणारे डाय वापरण्यापेक्षा हा एक नैसर्गिक उपाय करून पाहा (home remedy for gray hair)...

ठळक मुद्देपांढरे केस काळे करण्यासाठी आता घरगुती पदार्थ वापरून हर्बल हेअर डाय कसा करायचा ते आता पाहूया....

हल्ली कमी वयातच खूप जणांचे केस पांढरे होत आहेत. पांढरे केस काळे करण्यासाठी कमी वयापासूनच हेअर डाय किंवा केमिकल्स असणारे हेअर कलर वापरायला अनेकांना नको वाटतं (How to make herbal hair colour at home). डाय किंवा कलर वापरायचा नसेल तर केस रंगविण्याचा दुसरा पर्याय म्हणजे मेहेंदी. पण मेहेंदी लावणंही अनेकांना कटकटीचं वाटतं. शिवाय मेहेंदी लावल्याने केस रुक्ष, ड्राय होतात, अशी तक्रारही बऱ्याच जणींची असते (home remedy for gray hair). त्यामुळेच आता मेहेंदीची कटकटही नको आणि विकतचे केमिकल्स असणारे डाय किंवा कलर वापरण्याची भीतीही नको (how to turn gray hair black). पांढरे केस काळे करण्यासाठी आता घरगुती पदार्थ वापरून हर्बल हेअर डाय कसा करायचा ते आता पाहूया.... (Herbal dye for white hair using aamla)

केसांसाठी घरगुती डाय कसा तयार करायचा?

 

साहित्य

२ ते ३ आवळे

१ टेबलस्पून कॉफी पावडर

३ टेबलस्पून खोबरेल तेल

वर दिलेल्या सगळ्या साहित्याचं प्रमाण तुमच्या केसांच्या लांबीनुसार कमी- जास्त करा..

 

कृती

सगळ्यात आधी तर आवळे किसून त्याचा रस काढून घ्या.

गॅसवर एक लाेखंडी कढई तापायला ठेवा. लोखंडी कढई नसेल तर दुसरी कढई किंवा पातेले ठेवले तरी चालेल. पण लोखंडी कढईत हा डाय केल्यास अधिक चांगला परिणाम दिसून येतो.

कढईमध्ये आवळ्याचा रस, कॉफी पावडर आणि खोबरेल तेल टाकून चांगले उकळून घ्या. 

हे मिश्रण जेव्हा उकळून काळसर रंगाचे दिसू लागेल, तेव्हा गॅस बंद करा.

हा तयार झाला आता आपला घरगुती डाय. हा डाय जेव्हा थंड होईल, तेव्हा तो पांढऱ्या केसांवर लावा. यानंतर २ ते ३ तासांनी केस धुवून टाका. 

किंवा रात्री हा डाय डोक्याला लावून सकाळी केस धुतले तरी चालेल. फक्त उशीवर एखादा खराब कपडा टाका. कारण उशी खराब होऊ शकते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी