Lokmat Sakhi >Beauty > फक्त १० रुपयांत घरच्याघरी तयार करा बाॅडीलोशन, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणारच नाही... 

फक्त १० रुपयांत घरच्याघरी तयार करा बाॅडीलोशन, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणारच नाही... 

Skin Care Tips For Winter: महागड्या बॉडीलोशनवर खर्च करण्यापेक्षा घरच्याघरी फक्त १० रुपयांत बॉडीलोशन तयार करून पाहा.. (Home made body lotion in just 10 Rupees)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2023 01:03 PM2023-12-07T13:03:55+5:302023-12-07T13:04:46+5:30

Skin Care Tips For Winter: महागड्या बॉडीलोशनवर खर्च करण्यापेक्षा घरच्याघरी फक्त १० रुपयांत बॉडीलोशन तयार करून पाहा.. (Home made body lotion in just 10 Rupees)

How to make home made body lotion? Home made body lotion in just 10 Rupees, Home remedies for soft skin, skin care tips for winter | फक्त १० रुपयांत घरच्याघरी तयार करा बाॅडीलोशन, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणारच नाही... 

फक्त १० रुपयांत घरच्याघरी तयार करा बाॅडीलोशन, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणारच नाही... 

Highlightsया होममेड बॉडीलोशनचा नियमित वापर केल्यास थंडीत त्वचा कोरडी पडणार नाही. 

हिवाळा सुरू झाला की त्वचेच्या अनेक तक्रारी सुरू होतात. त्वचा कोरडी पडू लागते. त्वचेवर काही क्रिम लावलं नाही तर ती पांढरट, भुरकट दिसू लागते. बऱ्याचदा तर हिवाळ्यातल्या थंड- कोरड्या हवेमुळे खूप टॅनिंग होऊन त्वचा काळवंडते (Home remedies for soft skin in winter). त्वचेच्या या तक्रारी दूर करण्यासाठी तिला मग नियमितपणे बॉडी लोशन, मॉईश्चरायझर लावावं लागतं. पुन्हा पायांसाठी आपण वेगळं क्रिम वापरतो (How to make home made body lotion?). हा सगळा खर्च टाळण्यासाठी हा बघा एक उत्तम उपाय... हे क्रिम तुम्ही हातांपासून तळपायांपर्यंत वापरू शकता (Home made body lotion in just 10 Rupees). त्यामुळे त्वचा छान कोमल राहण्यास मदत होईल (skin care tips for winter).

 

घरच्याघरी बाॅडी लोशन तयार करण्याची पद्धत

हिवाळ्यात घरच्याघरी बॉडी लोशन कसं तयार करायचं, याविषयीची माहिती beauty__secrets_with_shalini या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

लग्नसराईसाठी १ हजार रुपयांंत घ्या सुंदर डिझायनर साडी, पाहताक्षणीच सगळे म्हणतील वाह वा!!

बॉडी लोशन तयार करण्यासाठी साहित्य

२ टीस्पून ॲलोव्हेरा जेल

२ टीस्पून रोज वॉटर

अर्धा टीस्पून ग्लिसरीन

३ ते ४ थेंब लिंबाचा रस

१ टीस्पून खोबरेल तेल

 

कृती

वरील साहित्य वापरून बॉडी लोशन तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे.

यासाठी एका वाटीमध्ये वरचं सगळं साहित्य एकत्र करा.

'The Archies' च्या प्रिमियरला खुशी कपूरला पाहताच अनेकांना आठवली श्रीदेवी, बघा त्यामागचं इमोशनल कारण.... 

यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हलवून घ्या. 

५ ते ७ मिनिटे जेव्हा तुम्ही सलगपणे हलवाल, तेव्हा त्या मिश्रणाचा रंग बदलेल. त्यानंतर ते मिश्रण एका एअर टाईट डबीमध्ये भरून ठेवा.

नाचतानाही आराध्याला पकडूनच ठेवत होती ऐश्वर्या, व्हिडिओ पाहून नेटिझन्स म्हणाले अगं आता तरी तिला.....

दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर संपूर्ण अंगाला हे बॉडीलोशन लावून हलक्या हाताने मसाज करा.

रात्री झोपण्यापुर्वी तळपाय स्वच्छ धुवून घ्या आणि तळपायालाही हे बॉडी लोशन लावून मसाज करा. 

या होममेड बॉडीलोशनचा नियमित वापर केल्यास थंडीत त्वचा कोरडी पडणार नाही. 

 

Web Title: How to make home made body lotion? Home made body lotion in just 10 Rupees, Home remedies for soft skin, skin care tips for winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.